राजकिय

जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला मिळवून दिली आहे : कृषिमंत्री धनंजय मुंडे

राहुरी, दि. 9मे (प्रतिनिधी)
जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला मिळवून दिली आहे देशाचा अभिमान ज्याला असेल त्याने येत्या १३ तारखेला देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत आणि खासदार डॉ.सुजय विखे व्हावेत यासाठी राष्ट्र अभिमान मनात ठेवून मतदान करावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरातून प्रचार रॅली आणि त्‍यानंतर आयोजित केलेल्‍या जाहीर सभेत कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजीमंत्री शिवाजी कर्डिले, डॉ.सुजय विखे पाटील, रावसाहेब चाचा तनपुरे, उत्तमराव म्हसे, नामदेव ढोकणे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, उदयसिंह पाटील, विक्रम तांबे, आर आर तनपुरे, तानाजी धसाळ, सुनील भट्टड, सुरेश बानकर, शामराव निमसे, किशोर वने, विक्रम तांबे, प्रफुल्ल शेळके, देवेंद्र लांबे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी म्‍हणाले की, सत्तर वर्षे ज्यांना देशाचा विकास करता आला नाही ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत आहेत. सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत त्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी देशाला पत आणि प्रतिष्ठा मिळून दिल्‍यामुळेच भारत आज जगाच्या पाठीवर विश्वगुरू म्हणून नेतृत्व करत असून, याचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदी यांना आहे. खासदार डॉ.सुजय विखे यांनी देखील अहमदनगरचा विकास गतिमान केला असून, त्याचे अनेक उदाहरणे देता येतील. ज्याला राष्ट्र अभिमान आहे त्यांनी पंतप्रधान मोदी व डॉ.सुजय विखे पाटील यांना मतदान करून देशाला पुढे नेण्याचे काम करावे. समोरचा उमेदवार हा बहुरूपी उमेदवार आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका अन्यथा रडत पस्‍तावा करण्‍याची वेळ तुमच्‍यावर येईल असे ते म्‍हणाले.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, पाच वर्ष आमदार असताना त्यांना पारनेरचा विकास साधता आला नाही, ते आता जिल्ह्याच्या विकासाची भाषा करत आहेत. मात्र आम्ही गेली सहा वर्ष जनतेच्या बरोबर राहून जिल्ह्याचा विकास साधला आहे. राहुरी तालुक्याने विखे पाटील कुटूंबावर नितांत प्रेम केले आहे. याही निवडणुकीमध्ये हे प्रेम तसेच राहणार आहे. समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्‍याचे काम राहुरीची जनता करणार आहे. खासदार असताना मला विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून धमकी दिली जाते तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न देखील विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
पद्मश्री डॉ.विखे पाटील यांच्‍या नंतर आम्ही काय काम केले असा प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांनी आमच्याबरोबर जिल्ह्यात फिरावे आम्ही काय कामे केली आहेत ते त्‍यांना दाखवून देऊ. राहुरी तालुक्यातील अनेक प्रश्न आम्ही मिटवले, प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालय हे प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिले ते मिटवण्याचे काम आम्ही केले. पारनेरची जनता दहशतीखाली आहे मात्र आम्ही जिल्ह्यात असे होऊ देणार नाही. टक्केवारी खाणारे कोण हे जनता जाणून आहे. नगर-मनमाड रोडमध्ये टक्केवारी खाऊन कामं कोणी बंद पाडले हे जनता जाणून आह. मंत्री असताना देखील ग्रामीण रुग्णालय देखील उभारता आले नाही, त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार काय असा प्रश्न उपस्थित करुन, ही निवडणूक देश हिताची आहे त्यामुळे जनता कोणत्याही गुंडाला राजकारणात थारा देणार नाही, कारखाना बंद पाडण्याचे पाप करणारे आमच्यावर आरोप करतात हे दुर्दैव असल्‍याचे ते म्‍हणाले.
यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, राहुरी तालुका एक नंबरचे लीड देईल यात शंका नाही. भाजपाच्या माध्यमातून मोठा विकास तालुक्‍यात झाला आहे. नरेंद्र मोदीच तिस-यांना पंतप्रधान होतील व खासदार सुजय विखे हेच होतील यात शंका बाळगण्याचे कारण नाही. संसद बंद पाडण्याची भाषा करणारे लंके यांनी पात्रता तपासावी. मिरची, भाकरी खाताना फोटोसेशन समोरचा उमेदवार करीत आहे. राहुरी शहराचे अनेक कामे खा.सुजय विखे पाटील, ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गी लावले आहे. भुयारी गटार योजना, प्रशासकीय इमारत त्यांनीच केली. कारखान्याबाबत आरोप होत आहेत मात्र तो चालू करण्यासाठी खा.विखे व मी प्रयत्न केले. चालू केला मात्र त्याचे वाटोळे करण्याचा प्रयत्न कोणी केला, कोणाच्या काळात हे घडले हे राहुरीची जनता जाणून आहे. महावितरणच्या माध्यमातून राहुरीच्या मंत्र्याने वसुलीचे काम केले असून, डॉ.सुजय विखे पाटील तालुक्‍यातून पाच लाखाचा लिड मिळणार असल्‍याचे ते शेवटी म्‍हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे