शहर वाहतुक शाखा, अहमदनगर नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्नेहालय येथील अनाथ मुलींकडुन राखी बांधुन रक्षाबंधन साजरे

अहमदनगर – भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, शहर वाहतुक शाखा, अहमदनगर नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आज दि. ०२/०९/२०२३ रोजी अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरे केले.
अहमदनगर शहरातील स्नेहालय संचलित डॉ. कलाम बालभवन प्रकल्प (सिध्दार्थनगर) येथील अनाथ मुलींकडुन शहर वाहतुक शाखा, अहमदनगर नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधुन रक्षाबंधन साजरे करण्यात आले. स्नेहालय संचलित डॉ. कलाम बालभवन प्रकल्प (सिध्दार्थनगर) येथील सौ. विणा मॅडम, सदर मुलांचे शिक्षक श्री प्रदिप भोसले सर यांचे संकल्पनेतून सदरचा कार्यक्रम पार पडला. सदर वेळी शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री मोरेश्वर पेन्दाम, श्रेणी पोउनि / पाटोळे, श्रेणी पोउनि गायकवाड व शहर वाहतुक शाखा नेमणुकीतील पोलीस अंमलदार हजर होते. शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री मोरेश्वर पेन्दाम यांनी यावेळी स्नेहालय संचलित डॉ. कलाम बालभवन प्रकल्प (सिध्दार्थनगर) येथील मुलींना रक्षाबंधन या सणाचे महत्व समजावून सांगुन रक्षाबंधनाचा सण कसा अस्तित्वात आला बाबाबत माहीती दिली. तसेच स्त्री अत्याचाराबाबत प्रबोधन करुन भविष्यात पोलीसांची मदत हवी असल्यास २४ तास कधीही फोन करा तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे स्नेहालय येथील काही विदयार्थ्यांनी पोलीस भरतीबाबत मुद्दा उपस्थित केल्याने त्यांना पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असल्यास योग्य ते मार्गदर्शन व मदत करण्याचेही आश्वासन दिले. यावेळी शिक्षक श्री प्रदिप भोसले सर यांनी वाहतुक पोलीसांचे आभार मानले. त्यानंतर सदर मुलांना व शिक्षकांकरीता अल्पोपहार करून त्यांना आदरपूर्वक रवाना केले. सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यक्रमाकरीता उपस्थित अनाथ मुलांचे चेहऱ्यावर मोठया प्रमाणात आनंद दिसुन आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखचे पोलीस निरीक्षक, मोरेश्वर पेन्दाम, स्नेहालय संचलित डॉ. कलाम बालभवन प्रकल्प (सिध्दार्थनगर) येथील सौ. विणा मँडम, सदर मुलांचे शिक्षक श्री प्रदिप भोसले सर यांनी केले