प्रशासकिय
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार!

अहमदनगर दि १८ मे (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा स्नेहबंध फाउंडेशनतर्फे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सत्कार करून त्यांना उत्कृष्ट कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
येरेकर मूळ नांदेड जिल्ह्यातील आहेत. ते २०१८ बॅचचे अधिकारी आहेत. प्री-आएएएस कोचिंग सेंटर, नागपूर येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले.
गडचिरोली येथून अहमदनगर जिल्हा परिषद येथे नियुक्त करण्यात आलेले येरेकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांना नव्या वाटचालीसाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपस्थित होते.