अहमदनगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघ व राष्ट्रवादी युवक च्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद देण्याची मागणी

अहमदनगर दि.२० (प्रतिनिधी)- शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद द्यावे या मागणीचे निवेदन खासदार सुप्रियाताई सुळे यांना देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, अहमदनगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी, दिनेश जोशी, आदिनाथ येडे, चैतन्य कुलकर्णी, दामोदर देशपांडे, प्रशांत भालेराव, विजय देशपांडे आदी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनपूर्वक कामामुळे अनेक विकास कामांनी सध्या शहरात गती पकडली आहे. कोरोणाच्या अडचणीच्या काळात ही आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील जनतेची पुरेपूर काळजी घेतली. तसेच राष्ट्रवादी युवकचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी म्हणाले की शहराच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर करून आणला तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असून देखील संग्राम जगताप यांना व त्यांच्या कामाची दखल व त्यांच्याकडे असलेला व्हींजन लक्षात घेऊन सर्व ब्राह्मण समाजाने तसेच अनेक समाजांनी त्यांना पाठिंबा दर्शविला होता. केवळ पक्षादेश म्हणून रिंगणात उतरले त्यावेळच्या त्यांच्या प्रचाराने खरंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाने खऱ्या अर्थाने उभारी घेतली आणि विधानसभेमध्ये पक्षाला जिल्ह्यात मोठे यश मिळालं व दुसऱ्यांना दणदणीत विजय मिळवून दिला. सध्या जिल्ह्यात कार्यकाळ आणि विकास कामाची पूर्तता या दोन्हींमध्ये आमदार संग्राम जगताप हे अव्वल असून ज्येष्ठ आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही. शहरात सर्व धर्मियांनी सोबत घेऊन शहराचे वातावरण सलोख्याचे ठेवण्याची जबाबदारी आमदार जगताप हे व्यवस्थित आणि कसोशीने करत आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप हे मंत्री पदासाठी नगर जिल्ह्यात सर्वात योग्य व जेष्ठ युवक आमदार असून त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी तसेच अहमदनगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी, दिनेश जोशी, आदिनाथ येंडे, चैतन्य कुलकर्णी, दामोदर देशपांडे, प्रशांत भालेराव, विजय देशपांडे यांनी केली आहे.