मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची झाली युती! अहमदनगर,जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्भूमीवर हा निर्णय अत्यंत म्हत्वाचा: सुमेध गायकवाड

मुंबई दि.४ जानेवारी (प्रतिनिधी)
राज्याच्या राजकीय समीकरणात मोठी घडामोड झाली असून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची झाली युती झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून बहुजन विकास आघाडी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्याशी आघाडी करण्याबाबत विधाने केली जात होती. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. स्वतः जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत पत्रकार परिषद घेत आगामी आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जोगेंद्र कवाडे याची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कवाडे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आमची युती होत आहे. शिव, शाहू, फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. युती बाबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव सुनील क्षेत्रे, प्रा जयंत गायकवाड,नितीन कसबेकर,ज्येष्ठ नेते सुरेश भिंगारदिवे, सोमा शिंदे यांनी समाधान व्यक्त करत.
अहमदनगर,जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्भूमीवर हा निर्णय अत्यंत म्हत्वाचा मानला जात असून या लवकरच स्थानिक दोन्ही पक्षांचे पदाधिकारी
व कार्यकर्ते बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,जिल्हा सरचिटणीस महेश भोसले, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे यांनी दिली आहे.