रस्त्यालगतच हॉस्पिटलच्या आवाराची भिंत बांधणाऱ्या “या” हॉस्पिटलवर कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करू सामजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी दिले आयुक्तांना निवेदन!

अहमदनगर दि. ९ डिसेंबर (प्रतिनिधी) रस्त्यालगतच हॉस्पिटलच्या आवाराची भिंत बांधणाऱ्या “या” हॉस्पिटलवर कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करू सामजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी दिले आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या तारकपूर बस स्टँड जवळील झेंडे हॉस्पिटलने महानगर पालिका व सार्वजनिक नियम तोडत रस्त्यालगतच आवाराची भिंत बांधल्याचे समोर आले आहे.
सामजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात
तारकपूर बस स्टॅन्ड जवळील झेंडे हॉस्पिटलमध्ये मनपा हद्दीत मध्ये रस्त्या पासून 6 मिटर अंतर सोडून बांधकाम कराव्याचे असते असा सार्वजनिक बांधकाम विभागाचा नियम असताना देखील झेंडे हॉस्पीटल यांनी रस्त्या लागतंच पक्के वॉल कंपाऊंड केले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. याबाबत दुसरे निवेदन सार्वजनिक बांधकाम यांना देण्यात आले आहे.
झेंडे हॉस्पिटलमध्ये बेसमेंट ला पार्किंग असून या पार्किंग मध्ये डॉक्टर यांचे opd व मेडिकल स्टोअर, सोनोग्राफी सेंटर, रक्त लघवी तपासनी सेंटर चालू आहे व टू व्हिलर व चार चाकी वाहन रोड वर उभी केले जातात. त्या मुळे येथे रोज छोटे मोठे अपघात होऊन वाहतूक कोंडी होते असते. असे निवेदनात नमूद केले असून
लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा कार्यकर्ते समवेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.