पुणे जिल्हास्तरीय स्कूल फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये नगरचा पै.ओमकार प्रकाश पोटे याचा प्रथम क्रमांक

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पै. मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र भोसरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती फ्रीस्टाइल स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील (ता – नगर ) मौ.निंबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस,प्रकाश पोटे यांचे चिरंजीव पै.ओमकार प्रकाश पोटे याने जिल्हास्तरीय कुस्ती फ्रीस्टाइल मध्ये विविध डावपेच्ने समोरच्या खेळाडूवर कुस्त्यात चितपटीने आसमान दाखवून मात केली. 14 वर्षाखालील वयोगटात 38 किलो वजन गटांमध्ये तीन कुस्त्या झाल्या तिन्ही कुस्त्यांमध्ये पै.ओमकार पोटे यांनी चितपटीने विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकविला याबद्दल पै.ओमकार पोटे हिंदकेसरी पै.अमोल बुचडे यांच्याकडे सराव करत असुन पोटे यांचे नगर शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.