संगमनाथ महाराज, नगरच्या ज्येष्ठ मल्लांना छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धा आखाडा पूजनाचा किरण काळेंनी दिला मान
शहरासह जिल्ह्यातील मल्लांची उपस्थिती, पै. लोंढे पै. कोतकर यांचा निवडीबद्दल सत्कार

अहमदनगर दि.२३ मे (प्रतिनीधी)वाडिया पार्क स्टेडियम : किरण काळे युथ फाऊंडेशन आयोजित छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धेची सध्या शहरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारी सकाळी शहरासह जिल्ह्यातून आलेल्या ज्येष्ठ मल्लांच्या उपस्थितीमध्ये आखाडा पूजन पार पडले. स्वागताध्यक्ष तथा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात आखाडा पूजन करण्याचा मान काळे यांनी माळीवाडा विशाल गणपती मंदिराचे मुख्य पुजारी संगमनाथ महाराज, नगरच्या ज्येष्ठ मल्लांना देत कुस्ती क्षेत्रातील मल्लं, वस्ताद आणि कुस्ती प्रेमींची मने जिंकली. यावेळी सर्व ज्येष्ठ मल्लांनी सामूहिकरीत्या आखाडा पूजन केले.
यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, स्पर्धेच्या संयोजन सल्लागार समितीचे प्रमुख नगरसेवक पै. सुभाष लोंढे, सहप्रमुख पै. हर्षवर्धन कोतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, विद्यार्थी काँग्रेस जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी शिवसेना शहर प्रमुख प दिलीप सातपुते, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, काँग्रेस नगरसेवक आसिफ सुलतान, महाराष्ट्र उपकेसरी पै.अनिल गुंजाळ, सावेडी सेनाप्रमुख काका शेळके, नगरसेवक पै. संग्राम शेळके, पै. सागर गायकवाड, पै. नानासाहेब डोंगरे, संदीप बारगुजे, ॲड. अभिषेक भगत, विलास चव्हाण, नगरसेवक सुनीलमामा कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, अनिल ढवण निलेश सत्रे, ओमकार सातपुते आदींसह यावेळी मल्ल, राजकीय पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, कुस्ती हा आपला भारतीय देशी खेळ आहे. सामान्य शेतकरी, हमाल, कष्टकरी यांच्या मुलांनी स्वकष्टाच्या जोरावर उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत महाराष्ट्र केसरी सारख्या अनेक नामांकित स्पर्धांमध्ये बक्षिसं पटकावली आहेत. हा खेळ जिवंत राहिला पाहिजे, या खेळाला जास्तीत जास्त प्रोत्साहन आणि ग्लॅमर मिळालं पाहिजे. म्हणूनच या स्पर्धांचे किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
नगर शहर, जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त मल्लांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. अनेक वर्षांनंतर नगरच्या वाडिया पार्क स्टेडियममध्ये कुस्त्यांचा थरार रंगणार असल्यामुळे हजारोंच्या संख्येने कुस्ती प्रेमींची गर्दी या स्पर्धेला होणार असल्यामुळे कुस्ती प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार असल्याचे काळे यावेळी म्हणाले. संयोजन सल्लागार समितीच्या प्रमुखपदी पै. सुभाष लोंढे, सहप्रमुखपदी पै.हर्षवर्धन कोतकर यांची निवड झाल्याबद्दल स्वागताध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार किरण फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला.
यावेळी नगरसेवक पै. लोंढे म्हणाले की, किरण काळे यांनी या राज्य पातळीवरच्या भव्य स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेत नगरची मान उंचावण्याचे काम केले आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही उत्तमरित्या पार पाडत या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत एक वेगळा मापदंड घालून देण्याचे काम निश्चितपणे करू. सहप्रमुख पै. कोतकर म्हणाले की, माझ्या सारख्या तरुण पैलवानावर काळे यांनी विश्वास दाखवला आहे. स्पर्धा मोठी आहे. मात्र माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचे काम आम्ही सर्व टीम म्हणून करू.
पै. वैभव लांडगे म्हणाले की, स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातून कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून नगरच्या क्रीडानगरीत रंगणाऱ्या या कुस्ती स्पर्धेमुळे राज्यातील अनेक महत्त्वाचे कुस्ती आखाडे संबंधित आयोजकांना रद्द करावे लागले आहेत. मल्लांनी नगरच्या कुस्ती मैदानाला भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे या स्पर्धांना विशेष महत्त्व महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याचा आनंद आहे. स्वागताध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा नगर शहराच्या कुस्ती इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरतील असा विश्वास यावेळी पै. लांडगे यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, माजी नगरसेविका जरीना पठाण, बिबीशन चव्हाण, प्रशांत जाधव, शहर जिल्हा उपाध्यक्ष हनिफ जहागीरदार, संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे, हनिफ मोहम्मद जहागीरदार, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जुबेर सय्यद, नगरसेवक फारुक शेख, अल्पसंख्यांक काँग्रेस आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, माजी नगरसेवक फय्याज शेख, सुनील सिंगारे बंडू गिरी मोहन हिरणवाळे, काँग्रेस महासचिव इम्रान बागवान मिलींद जपे पैलवान वैभव कदम अजय अजबे बजरंग शेळके गणेश आपले नामदेव लंगोटे दीपक डावकर शिवाजी चौधरी, चालू आहे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.