नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगर पुणे रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून पिकअप चालविणाऱ्या चालकाला लुटले!

अहमदनगर (प्रतिनिधी २३ नोव्हेंबर)नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगर पुणे रस्त्यावर पिकअप चालविणाऱ्या चालकाला लुटन्याची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे वाहन चालविणाऱ्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की,
:-चाकूचा धाक दाखवून पिकअप ड्रायव्हरला लुटल्याची घटना नगर पुणे रोडवर हॉटेल माथेरान जवळ चास तालुका नगर येथे २२ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली आहे. यातील फिर्यादी अनिल रामदास डरंगे ड्रायव्हर (वय ३० रा.रांजणी हल्ली रा.सारसनगर मार्केटयार्ड अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की नगर पुणे रोडवर पिकअप गाडीला ओव्हरटेक करून काळ्या रंगाच्या पल्सरवर तीन अनोळखी इसमानी पिकअप गाडीला ओव्हरटेक करून गाडी समोर आडवे झाले व फिर्यादी अनिल डरंगे यांना गाडीला कट मारला म्हणून त्यांना गाडीच्या खाली ओढून शिवीगाळ करून तसेच यातील दोन जणांनी अंधारात नेऊन चाकूचा धाक दाखवला व यातील एका जणाने गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे ठेवलेले पैसे काढून घेतले.एकूण १,१३,०५० रुपये रोख रक्कम घेऊन पळून गेले.नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये पिकअप ड्रायव्हर अनिल डरंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरन ८१८/२०२२ भादविक ३९२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोसई चव्हाण करत आहेत.