संगमनेर येथे अवैधरित्या चालणा-या हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेने टाकला छापा! 55,750/- रु. किंमतीचे साहित्य जप्त!

अहमदनगर दि.१७ नोव्हेंबर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील संगमनेर संगमनेर येथे अवैधरित्या चालणा-या हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेने पार्लरवर छापा टाकला असून 55,750/- रु. किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईची
सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब, यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, संतोष लोढे, राहुल सोळुंके, पोकॉ/सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व भरत बुधवंत अशांना बोलावुन घेवुन संगमनेर परिसरात अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास लागलीच रवाना केले. पथक पेट्रोलिंग करुन माहिती घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे संतोष वांढेकर हा गुंजाळवाडी, संगमनेर येथील हॉटेल ग्रीन लिप शेजारी, पत्र्याचे शेडचे आडोश्याला हुक्का पार्लर चालवित आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता गुंजाळवाडी, संगमनेर येथील हॉटेल ग्रीन लिप शेजारी, पत्र्याचे शेडमध्ये तीन टेबलवर काही इसम हुक्का पिण्यासाठी लागणारा पॉटने हुक्का पिताना व एक इसमा हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य पुरविताना दिसला. पथकाची खात्री होताच पथकाने सदर ठिकाणा छापा टाकुन बसलेल्या इसमांना जागेवर बसण्यास सांगुन पोलीस पथकाची ओळख सांगितले. ताब्यात घेतलेल्या इसमास नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव 1) संतोष अशोक वांढेकर, वय 34, रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी, ता. संगमनेर असे सांगुन सदर हुक्का पार्लर मी स्वत: चालवत असल्याचे सांगितले. त्यास सदर हुक्का पार्लर चालविण्याचा शासनाच्या परवान्या बबत विचारपुस करता त्याने त्याचेकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले. त्यामुळे आरोपीने सार्वजनिकरित्या मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असा शासनाने बंदी घातलेल्या तंबाखुजन्य पदार्थ स्वत:कडे बाळगुन विनापरवाना हुक्का पार्लर चालवितांना मिळुन आल्यास त्यास हुक्का पिण्यासाठी लागणारे 55,750/- रु.किंमतीचे साहित्य व पिण्यासाठी आलेले इतर आठ इसमांसह ताब्यात घेवुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 971/2022 सिगारेट व तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापारी व वाणीज्य व्यवहार, उत्पादन पुरवठा वितरण याचे विनीमय) कलम 4 व 21 (1) प्रमाणे पोना/376 शंकर संपत चौधरी यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.