एचआयव्ही संसर्गित रुग्णांना आवश्यक सर्व सेवा देण्यास प्रवरा ग्रामीण रुग्णालय कटिबद्ध – डॉ. एन एस पवार

अहमदनगर (प्रतिनिधी)जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहमदनगर व ए आर टी केंद्र प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने राहता संगमनेर अकोले कोपरगाव श्रीरामपूर या भागातील एआरटी उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी सामाजिक संरक्षण योजना शिबिराचे आयोजन दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. सदर शिबिरात च्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. एन एस पवार डायरेक्टर हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन अँड पेशंट वेल्फेअर पीएमटी लोणी, यांनी सांगितले की शासन एचआयव्ही संसर्गित रुग्णांना विविध शासकीय योजना देण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आजचे सामाजिक संरक्षण शिबिर आयोजित केले आहे, तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, शासकीय योजना प्रमाणेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाकडून आरोग्य विषयक ज्या काही सेवा आवश्यक असतील त्या प्रवरा ग्रामीण रुग्णालय देण्याकरिता कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास डॉ. हेमंत कुमार , ब्रिगेडियर , वैद्यकीय अधीक्षक, पीएमटी लोणी डॉ. साबळे प्रोफेसर तथा नोडल ऑफिसर लोणी डॉ. स्वाती म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय लोणी , श्री अनिल मांढरे, मंडळ अधिकारी, राहता, श्री सुनील आंबेकर , श्री अरुण झांबरे डाग विभाग, श्री के डी अरगडे विस्तार अधिकारी कृषी , श्री दिलीप वामन आहेर, वाहतूक नियंत्रक कोपरगाव, श्री प्रशांत येंडे एन एम पी कोषाध्यक्ष , डॉ. सुधा कांबळे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉ. डी एन धामणे वैद्यकीय ,अधिकारी प्रवरा एआरटी केंद्र, श्री शिवाजी जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये श्री शिवाजी जाधव यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला व कोपरगाव राहता श्रीरामपूर संगमनेर अकोले तालुक्यातील रुग्णांसाठी शासकीय स्तरावर तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालय स्तरावर सेवा सुविधा उपचार देण्यासाठी घेण्यात येत असलेल्या परिश्रमांची, कार्यक्रमांची माहिती दिली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग शासकीय योजनांचे विभाग व रुग्ण यांचा समन्वय करत असल्याबाबत सांगितले ,
डॉ. हेमंत कुमार वैद्यकीय अधीक्षक प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी यांनी उपस्थित रुग्णांना यावेळी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन श्री प्रसन्न धुमाळ समुपदेशक, आयसीटीसी श्रीरामपूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री संतोष उबाळे समुपदेशक ग्रामीण रुग्णालय लोणी यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गणेश तोरणेकर श्री बाळकृष्ण कांबळे विजय वाघमारे समुपदेशक श्री राधाकिशन पाटोळे श्री अनिल फुलवर श्री संतोष उबाळे श्रीमती सुचित्रा, गायकवाड वैष्णवी सवाई तसेच पीएमटी ART केंद्रातील कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले.