दलित कुटुंबांना झालेली मारहाण व शिवीगाळ प्रकरणी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली भेट

शिर्डी दि.9 डिसेंबर (प्रतिनिधी )
हेमंत शेजवळ
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवरून दलित कुटुंबांना मारहाण व शिवीगाळ झाली हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले. त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गावात या प्रकरणावरून एक प्रकारे तेढ निर्माण होत गेली.मात्र या दुर्दैवी घटनेनंतर गावात शांतता असून कुणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये शांतता बाळगावी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी केले.तर शनिवारी राज्याची महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्मळ पिंपरी गावाला भेट देऊन या पीडित कुटुंबाची भेट घेतली. नंतर गावातील ग्रामस्थांची शांतता बैठक घेण्यात आली.
पिंपरी निर्मळ गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचे समर्थन होवू शकत नाही.या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून गावातील सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरीक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर अतिरीक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह सुरेंद्र थोरात, पप्पुभाऊ बनसोडे गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालया समोरच मंत्री विखे यांनी ग्रामस्थ तरूण कार्यकर्ते महीला यांच्याकडून झालेल्या घटनेची माहीती जाणून घेतली.गावातील काही कुटूबियांकडून होत अससलेल्या त्रासाची माहीती सर्वांनी मंत्र्यापुढे सांगून जाणीवपुर्वक घटनेत सहभाग नसलेल्या व्यक्तिवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे.खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आशी मागणी सर्वानी केली.
मंत्री विखे म्हणाले की,पिपरी निर्मळ गावात राजकीय झाला परंतू असा जातीय संघर्ष कधी झाला झाला नाही.परंतू झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून याचे समर्थन होवू शकत नाही .
परंतू घटना घडली त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक या सर्व घटनेची निपक्षपणाने चौकशी करतील असे मंत्री विखे यांनी जाहीर केले.ग्रामस्थांनी सुध्दा या घटनेबाबत काही माहीती चौकशी अधिकार्यांना द्यायची असेल तर द्यावी असे सूचित करून गावात विनाकारण सामाजीक तेढ निर्माण होईल .असा प्रयत्न होवू देवू नका .सामाजिक माध्यमातून काही मेसेज फिरत असतील तर गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळीच थांबवावेत. पोलीस प्रशासनाने सुध्दा वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
या भेटी प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.