अपघातग्रस्त तरुणाला महेश कडूस पाटलांची मदत केडगाव घोसपुरी रस्ता मृत्यूचा सापळा

किसानभारती /१६ डिसें (प्रतिनिधी )
केडगाव घोसपुरी सारोळा रस्ता आता मृत्यू चा सापळा ठरत असून काल सोनेवाडी येथे खड्ड्यात पडून तरूणाला जबर मार लागला आहे. रात्री च्या वेळी या रस्त्यावर प्रवास करणे आणखीन अवघड झाले आहे. अजय फटांगरे या इंडियन ऑईल कंपनी च्या कर्मचाऱ्याचा काल याच रस्त्यावर अपघात झाला.
अजयला जबर मार लागला, रक्त वाहत होते, बघ्यांच्या गर्दी मधे कोणीही अजयला मदत करायला तयार नव्हते. महेश कडूस पाटील यांनी या रस्त्यावरून जाताना हा प्रकार बघितला, काही तरुणांच्या मदतीने जखमीला त्यांनी आनंदऋषी हॉस्पिटल मधे तत्काळ भरती केले. अजय च्या कुटुंबा ला देखील बोलवून घेतले.
आज साखर वाटायचे निमित्ताने खासदार दक्षिणेत आहेत, खासदार गाडीने फिरतात पण सामान्य जनता ही दुचाकी वर असते, जनतेला खड्ड्यातून जावे लागते ही दुर्दैवी बाब आहे. खासदारांच्या काळात तालुक्यातील रस्ते आणि साकळाई चा प्रश्न सुटला नाही या बाबतीत जनतेने विचार केला पाहिजे असे आवाहन कृषी पदवीधर संघटना चे प्रदेशाध्यक्ष व सारोळा कासार व पंचक्रोशी मधील लोकप्रिय युवा नेते महेश कडूस पाटील यांनी केले आहे.