वाकोडी गावात खुलेआम हातभट्टी,मटका, दारूधंदे सुरू! जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन! अवैध धंदे कायम बंद न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण!

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर तालुक्यातील वाकोडी गावात खुलेआम राजरोसपणे हातभट्टी, दारूधंदे ,मटका सुरू आहे. याबाबत गावातील सामजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य शनेश्वर पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी आकाश निरभवणे,दया गजभिये,रवी सुर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
वाकोडी गावातील मध्यपींची संख्या वाढत आहे. त्यातून गावात आणि समाजावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. तसेच अल्पवयीन मुले सुद्धा या व्यसनाच्या आहारी जात आहेत. गावातील वाढत्या मध्यपीमुळे त्यांच्या गैरवर्तनूकीमुळे महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. तसेच अनेक महिला विधवा झाल्या आहेत, तसेच देशाचे भवितव्य असणाऱ्या युवा पिढीच्या मनावर यांचे दुष्परिणाम होत आहेत.
वाकोडी परिसर या ठिकाणी अवैधरित्या दारू, मटका, जुगार, आणि हातभट्टी दारू विक्री यासारखे अवैध धंदे राजरोसपणे चालू असल्यामुळे गावात बेरोजगारी,, भांडणतंटे आणि कलह निर्माण होत असून, सामाजिक स्वास्थ्यस बाधा निर्माण होत आहे.
तसेच गावाच्या फाट्यावर अवैधरित्या मटका, जुगार, आणि देशी- विदेशी दारूचे धंदे राजरोस पने चालू आहेत. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत त्यांना धंदे बंद करण्याचे कळवून देखील, त्यांनी आपले धंदे बंद केली नाहीत.
समाजात आणि गावात असंतोष निर्माण झाला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
सर्व अवैद्य धंद्यावर येत्या आठ दिवसात कारवाई करून धंदे कायमचे बंद करावेत. अन्यथा पोलिस अधीक्षक, कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.