पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने दलित बालकाची हत्या करणाऱ्या शिक्षकांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी!

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजस्थान येथील जालोर जिल्ह्यातील सुराणा या गावांमध्ये 23 जुलै ला गावातील सरस्वती विद्यालयात इयत्ता तिसरी वर्गात शिकणारा 8 वर्षीय दलित विद्यार्थी इंद्र मेघवाल या विद्यार्थ्याला आपली ताण भागवण्यासाठी त्याने शाळेतील माठा मधील पाणी पिला असल्याचे कारणावरून जातीयवादी विकृत मानसिकतेच्या विचाराने बुरसटलेल्या छैलसिंग राजपुरोहित मुख्याध्यापक व शिक्षकाने त्याला अतिशय निर्दयपणे मारहाण केली या मारहाणीमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला असुन राजस्थान मधील अशा जातीय विदारक अत्याचाराच्या या पुढे देशात कुठेही पुनरावृत्ती होणार नाही या साठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भर इंसाफ दो आंदोलनांतर्गत ठिकठिकाणी निदर्शन करण्यात आले असुन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शन करून निवेदन देण्यात आले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, सोमा शिंदे, उद्योजक लॉरेन्स स्वामी, गौतमी भिंगारदिवे, मीरा गवळी, राधा पाटोळे, शशिकांत देठे, सोमनाथ झेंडे, रंजना भिंगारदिवे, हिरा भिंगारदिवे, मनीषा खंडागळे, संगीता गायकवाड, रेखा साळवे, राणी डहाळे, मनोज ठोंबे, शशिकांत देठे, अक्षय बोरुडे, सिद्धांत गायकवाड, संघराज गायकवाड, तेजस गायकवाड आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की निंदनीय घटनेमुळे मानवता वादाला काळीमा फासणारया घटनेचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध नोंदून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की इंद्र मेघवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालया अंतर्गत चालून आरोपीला फाशी शिक्षा द्यावी तसेच इंद्र मेघवालच्या कुटुंबियास आर्थिक मदत द्यावी तसेच सरस्वती विद्यालयाची मान्यता रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.