गुन्हेगारी

श्रीरामपूर शहर पोलिसांनी ट्रॅक्टर चोरणा-या टोळीला केले मुद्देमालासह गजाआड!

अहमदनगर( प्रतिनिधी) श्रीरामपूर शहर पोलिसांना ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीला मुद्देमालासह गजाआड करण्यात यश आले आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी,जबरी चोरी,दरोडा असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले होते.
दिलेल्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी श्री.रघुनाथ नानासाहेब उघडे (रा.वडाळा महादेव,ता.श्रीरामपुर, जि.अहमदनगर) यांचा ट्रॅक्टर हा त्यांचे राहते घरासमोरुन दि.२४/०६/२०२२ रोजी रात्री चोरीला गेला होता,त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं.५५४ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पथक करीत असताना,पोलीस निरीक्षक श्री.हर्षवर्धन गवळी,यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,सदर ट्रॅक्टर चोरणारी टोळी श्रीरामपुर परीसरात परत ट्रॅक्टर चोरीस करण्यास येणार आहे, म्हणुन सदर बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना सांगुन,त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथक रवाना झाले बातमीप्रमाणे सापळा लावुन,शिताफिने यातील चार आरोपींना तपास पथकाने पकडले.त्यांना त्यांची ओळख विचारता त्यांनी त्यांचे नाव १ ) किरण शांताराम लासुरे,वय २५ वर्षे,रा. शिंगवे, ता.राहता,जि.अहमदनगर २) प्रल्हाद गोरक्षनाथ वरवंट, वय ४५ वर्षे,रा. शिंगवे, ता. राहता ३) रामा बाळासाहेब यादव,वय २९ वर्षे, रा.१४ नं.चारी,राहता,ता. राहता ४) मच्छिद्र भाऊसाहेब गायकवाड,वय २७ वर्षे,रा. बाबतारा,ता. वैजापुर,जि.औरंगाबाद असे असल्याचे सांगुन गुन्ह्याची कबुली दिली.त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन त्यांचे कडे तपास केला असता,त्यांचे कडुन दोन ट्रॅक्टर,ट्रॉली,आर्मीचर व चार मोबाईल असा एकुण १२,९०,०००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,असुन नाशिक जिल्ह्यातील १) वावी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २२९/२०२२ भादवि कलम ३७९ तसेच २) श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३८६/२०२२ भादवि कलम ३७९ असे गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आणले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हर्षवर्धन गवळी तपास पथकातील सपोनि जिवन बोरसे,पो.हे.कॉ/अतुल लोटके,पोकॉ/ गौतम लगड,पो.कॉ/राहुल नरवडे,पोकॉ/रमिझराजा अत्तार,पोकॉ/गणेश गावडे,पोकॉ/गौरव दुर्गुळे,पोकॉ/ संपत बढे,पोकॉ./मच्छिद्र कातखडे,पोकॉ/भारत तमनर, यांनी केली आहे. अधिक तपास सपोनि जिवन बोरसे हे करीत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे