अहमदनगर काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राणीताई पंडितांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी) : शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या वेगवेगळ्या फ्रंटल, सेल, आघाड्यांच्या नियुक्ती केल्या जात आहेत. रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राणीताई पंडित यांची निवड करण्यात आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या शिफारशीने, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे यांनी पंडित यांची निवड मुंबई येथून जाहीर केली असून राज्याचे माजी गृह, परिवहन राज्यमंत्री आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते पंडित यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
पंडित या महिला काँग्रेसच्या माध्यमातून पक्षात सक्रियपणे काम करत आहेत. त्यांच्यावर महिला काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष पदाची सुरुवातीला जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना पक्षात बढती देण्यात आली असून त्यांच्यावर रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा स्वतंत्र पदभार सोपविण्यात आला आहे. नियुक्ती बद्दल आ. पाटील व जिल्हाध्यक्ष काळे यांच्या हस्ते पंडीत यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस नेते अनिस चुडीवाला युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण गीते, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, माजी नगरसेवक फैयाज शेख, महिला काँग्रेसच्या ललिता मुदिगंटी, पुनम वंनम, ज्योतीताई साठे, मोमीन मिनाज, अर्चना पाटोळे, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, सरचिटणीस इमरान बागवान, पै. दीपक बापू जपकर, प्रशांत जाधव, सुफियान रंगरेज, क्रीडा काँग्रेस खजिनदार नारायण कराळे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, आकाश आल्हाट, मोहनराव वाखुरे, उमेशदादा साठे, गौरव कसबे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंडित म्हणाल्या की, मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. परंतु किरण काळे यांच्या विकासात्मक नेतृत्वाकडे आकर्षित होऊन मी काँग्रेस पक्षाचे काम शहरात करीत आहे. या माध्यमातून मला शहरातील महिलांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली. रोजगार व स्वयंरोजगार हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. शहरातील तरुण, महिला त्याचबरोबर सर्व घटकातील व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी या विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले जातील. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरविण्यासाठी पुढील काळात काम करणार असल्याचे पंडित यावेळी म्हणाल्या.
निवडीबद्दल माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, रोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी डॉ. जयश्रीताई थोरात, महानंदाचे चेअरमन इंद्रजीत देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. मोहन जोशी, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, प्रदेश सरचिटणीस सचिन गुंजाळ, प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष आकाश क्षीरसागर आदींनी अभिनंदन केले आहे.