निधन
निलक्रांती चौक येथील सामजिक कार्यकर्ते राकेश भोगवाल यांचे अकाली निधन!

अहमदनगर दि. १६ जुलै (प्रतिनिधी) फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे निलक्रांती चौक येथील सामजिक कार्यकर्ते,वंचित बहुजन आघाडीचे शहरातील कार्यकर्ते राकेश शामराव भोगवाल (वय ३६) यांचे अल्पशा आजाराने अकाली दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ ,पत्नी तसेच एक मुलगी नातेवाईक व मित्र परिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने निलक्रांती चौक व शहरातील आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!