लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने ‘ सामाजिक लायन्स सेवा सप्ताह 1 अक्टोबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत साजरा करणार – श्रीनिवास बोज्जा
अहमदनगर (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, वैदयकीय व सांस्कृतिक क्षेत्रात गेली 30 वर्ष सातत्याने सेवा करीत असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन च्या वतीने *लायन्स जागतिक सेवा सप्ताह* हा दिनांक 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर विविध सेवा कार्याने शहरात राबविण्यात येणार असल्याची माहिती लायन्स मिडटाऊनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.
शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी- मातोश्री येथील वृद्धाश्रमात लायन्सच्या माजी अध्यक्षा कै. सौ. राजश्री मांढरे समरणार्थ व श्रीकांत मांढरे .यांच्यावतीने मिष्ठांअन्न व स्नेहभोजन देण्यात येणार आहे. व दुपारी देहरे बुद्रुक येथील माऊली अनाथ वसतिगृहात छत्री वाटप करण्यात येणार आहे.
रविवार दि. 2 ऑक्टोबर – वाडिया पार्क येथील म.गांधी पुतळ्याला अभिवादन व पुष्पहार अर्पण करून …स्वछता मोहीम राबविण्यात येणार आहे.
सोमवार दि.३ ऑक्टोबर- तपोवन पाईपलाईन रोड येथील मूकबधिर विद्यार्थ्यांना भोजन देण्यात येणार आहे.
मंगळवार दि. 4 ऑक्टोबर-अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प चे आयोजन करण्यात येणार आहे.
बुधवार दि.5 ऑक्टोबर-सावेडी येथील वृद्धाश्रमात मिठाई वाटप करण्यात येणार आहे .
गुरुवार दि.6ऑक्टोबर- अहमदनगर हॉमोओपॅथी मेडिकल कॉलेज येथे कॅन्सर आजारावर होमोपथीक्स उपचार करण्यात येणार आहेत तसेच शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती लायन्स मिडटावून चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव प्रसाद मांढरे व ट्रेसरर संदीप चव्हाण यांनी माहिती दिली.