विधवा प्रथा बंद करण्या संदर्भात पारनेर नगरपंचायत मध्ये एक मताने ठराव मंजूर!

पारनेर दि.८ जून (प्रतिनिधी) :
गेले अनेक वर्षापासून विधवा प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीत पहावयास मिळत आहे . या पूर्वी अनेक त्यागी समाज सुधारकांनी या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न केला परंतु त्या विषयीही तीव्र विरोध पहावयास मिळाला.आपल्या समाजात पतीच्या निधना वेळी अंत्यविधी वेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे,गळ्यातील मंगळसुत्र तोडणे , हातातील बांगडया फोडणे,पायातील जोडवी काढणे तसेच महिलाला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक,सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही.कायदयाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे.या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायदयाचा भंग होत आहे. तेंव्हा पारनेर शहरासह देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे या करीता राज्यातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत,असे परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे.
शासनाच्या १७ मे रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातील विषया संदर्भात मंगळवारी पारनेर नगरपंचायत मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत नगर पंचायत सभागृहात सभागृहाचे अध्यक्ष व पारनेर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा अर्जुन भालेकर यांच्या अध्यक्षते खाली तसेच पारनेर नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली , महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. प्रियंका सचिन औटी यांनी या संदर्भात सूचक म्हणून ठराव मांडला . व त्या ठरावास पारनेर नगरपंचायतीचे सर्व विभागाचे सभापती , सर्व नगरसेवक यांनी एक मताने या ठरावास मंजुरी दिली .
आजच्या 21 व्या शतकातही अनेक ठिकाणी या अशा प्रथा पाळल्या जातात की ज्यामुळे महिलांचे जगन्या वावरण्यावर मर्यादा येतात. देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे,
यासाठी पारनेर नगरपंचायतने हा धाडसी निर्णय घेतला आहे .
विधवा प्रथा बंद करणेत येत आहे. या संदर्भात शहरामध्ये जनजागृती करणेत यावी. त्यासाठीही झालेल्या सभेमध्ये एकमताने मंजूरी देण्यात आली आहे.
###*****###
राज्यातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत, असं परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे. हे परिपत्रक १७ मे रोजी जारी करण्यात आले आहे.
आजच्या 21व्या शतकातही अनेक ठिकाणी या अशा प्रथा पाळल्या जातात की ज्यामुळे महिलांचे जगन्या वावरण्यावर मर्यादा येतात. देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे,
यासाठी पारनेर नगरपंचायतने हा निर्णय घेतला आहे
सौ.सुरेखा अर्जुन भालेकर
( उपनगराध्यक्षा नगरपंचायत पारनेर )