गुन्हेगारी

फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेला सैराट चित्रपटातील प्रिन्स स्वतः हून पोलिसात हजर! तीन तास कसून चौकशी सोमवारी पून्हा हजर राहण्यास सांगीतले

राहुरी (प्रतिनिधी)
मंत्रालयात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखों रूपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील चार जणांना अटक झाली आहे. सुरज पवार उर्फ सैराट चित्रपटातील प्रिन्स हा शुक्रवारी राहुरी पोलिसां समोर हजर झाला. सायंकाळी उशीरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.
८ सप्टेंबर रोजी राहुरी तालूक्यातील विद्यापीठ परिसरात पोलिस पथकाने सापळा लावून दत्तात्रय अरूण शिरसागर, वय ३१, राहणार दत्तनगर नाशिक. याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले होते. तर बाकी आरोपी पसार झाले होते. त्यानंतर या प्रकरणातील संगमनेर येथील आरोपी आकाश विष्णू शिंदे व ओंकार नंदकुमार तरटे, दोघे राहणार संगमनेर यांच्या मुसक्या आवळून गजाआड केले. त्या पाठोपाठ विजय बाळासाहेब साळे, वय ३७, राहणार खडांबे बु. ता. राहुरी. याला अटक करण्यात आली. तर त्याची पत्नी ज्योती विजय साळे ही पसार झाली आहे. या टोळीने राहुरी, श्रीरामपूर, नेवासा व नाशिक जिल्ह्यातील अनेक तरूणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखों रूपयांना गंडा घातलाय. नेवासा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर व
श्रीरामपूर येथील शुभम सतिष पानसरे या दोन तरूणांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात सैराट चित्रपटातील आर्चीचा भाऊ प्रिन्स म्हणजे सूरज बेलगंग्या पवार, वय २२ वर्षे, राहणार कात्रज, जि. पुणे. याला देखील आरोपी करण्यात आले होते. तसेच नागराज मंजूळे यांचेही नाव या प्रकरणात आले होते. त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते. घटने पासून पोलिस पथक प्रिन्स च्या मागावर होते. आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजे दरम्यान सूरज बेलगंग्या पवार ऊर्फ प्रिन्स हा स्वतःहून त्याचे वकिल दिपक शामदिरे यांच्या सोबत राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. रात्री उशीरापर्यंत पोलिस अधिकाऱ्यांकडून त्याची कसून चौकशी सुरू होती. चौकशी झाल्यानंतर त्याचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर सोडून देण्यात आले. तसेच त्याला पून्हा सोमवारी हजर राहण्या बाबत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे