ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर चालकास मारहाण करुन ट्रॅक्टर पळवुन घेवुन जाणारी टोळी जेरबंद, दोन ट्रॅक्टरसह 11,37,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत एलसीबी गुन्हे शाखेची मोठी कारवाई

अहमदनगर दि. 25 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 19/02/2024 रोजी फिर्यादी किशोर दत्तात्रय धिरडे वय 35 वर्षे, रा. भेर्डापुर, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर हे महांकाळवडगांव येथुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरुन घेवुन अशोकनगर साखर कारखाना श्रीरामपुर येथे जात असतांना खोकर फाटा येथे ट्रॉलीचे टायर पंचर झाल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली रोडचे कडेला उभा करुन थांबलेले होते. त्यावेळी काळे रंगाचे स्विफ्ट कारमधुन 4 अनोळखी आरोपींनी येवुन फिर्यादीस काहीतरी हत्याराचा धाक दाखवुन फिर्यादीस स्विफ्ट कारमध्ये बसवुन फिर्यादीचा ट्रॅक्टर बळजबरीने चोरुन घेवुन गेले बाबत श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 75/2024 भादवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 22/02/2024 रोजी रात्री फिर्यादी श्री अरुण सिताराम पवार रा. निपाणी निमगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर हे भानसहिवरे शिवारातुन त्यांचा ऊसाचा ट्रॅक्टर घेवुन जात असतांना त्यांचे ट्रॅक्टरला स्विफ्ट गाडी आडवी लावुन फिर्यादीस मारहाण करुन त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 172/2024 भादवि कलम 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वरील दोन्ही गुन्हे करण्याची पध्दत ही सारखीच असल्याने व दोन्ही गुन्हे गंभीर स्वरुपाचे असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, यांनी पोनि श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. पोलीस पथकाने वरील दोन्ही गुन्हा घडले ठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणी आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज पडताळुन तसेच गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक 24/02/2024 रोजी पोनि श्री दिनेश आहेर यांना सदरचे गुन्हे हे आरोपी नामे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख रा. कोल्हार बु, ता. राहाता याने व त्याचे इतर साथीदारांनी केले असल्याची माहिती मिळाली. सदर बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी पोलीस पथकास सुचना देवुन रवाना केले. पोलीस पथक आरोपीची माहिती काढत असतांना सदर आरोपी हा त्याचे राहते घराजवळ थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ सदर आरोपीचे राहते घरी जावुन खात्री करता आरोपीचे राहते घरासमोर एका स्विफ्ट कारजवळ दोन इसम व कारमध्ये काही इसम बसलेले दिसले. पथकाने त्यांना घेराव घालुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख वय 30 वर्षे, रा. अंबिकानगर, कोल्हार बुाा, ता. राहाता, 2) शकिल नजीर शेख वय 24 वर्षे, रा. अंबिकानगर, कोल्हार बुाा, ता राहाता, 3) विशाल सुनिल बर्डे वय 26 वर्षे, रा. अंबिकानगर, कोल्हार बुाा, ता राहाता, 4) अक्षय श्रीराम जमधडे वय 20 वर्षे, रा. अंबिकानगर, कोल्हार बुाा, ता. राहाता, 5) सोहेल नसीर शेख वय 20 वर्षे, रा. पिंजारगल्ली बाजारतळ, कोल्हार बु ाा ता. राहाता, 6) विवेक लक्ष्मण शिंदे वय 26 वर्षे, र. टाकळीभान ता. श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी खोकर फाटा, श्रीरामपुर व भानहिवरा ता. नेवासा येथील दोन्ही गुन्हे त्यांचा फरार साथीदार 7) राहुल आहेर, पुर्ण नांव माहित नाही. रा. भोकर, ता. श्रीरामपुर याचे मदतीने केला असल्याचे सांगितले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची झडती घेता त्यांचेझडतीमध्ये गुन्ह्यात वापरले हत्यार एअर पिस्टल, लोखंडी कत्ती, तसेच रोख रक्कम, स्विफ्ट कार, मोबाईल तसेच आरोपी अल्लाउद्दीन शेख याचे घराचे पाठीमागील काटवनातुन दोन चोरीचे ट्रॅक्टर असा एकुण 11,37,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 75/2024 भादवि कलम 394, 34 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी ईकबाल उर्फ सोन सिकंदर शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द अहमदनगर, छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुन, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणणे, शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे एकुण 16 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीरामपुर तालुका 101/2018 भादवि कलम 392, 342, 34
2 श्रीरामपुर तालुका 103/2018 भादवि कलम 392, 342, 34
3 श्रीरामपुर तालुका 105/2018 भादवि कलम 353, 143, 147
4 श्रीरामपुर तालुका 392/2018 भादवि कलम 394, 397
5 श्रीरामपुर तालुका 364/2021 भादवि कलम 323, 504, 506
6 एम.आय.डी.सी. 299/2021 आर्म ऍ़क्ट 3/25, 7
7 श्रीरामपुर तालुका 76/2022 भादवि कलम 354, 323
8 श्रीरामपुर तालुका 312/2022 भादवि कलम 302, 201
9 सातारा खंडोबा, छ. संभाजीनगर 413/2022 भादवि कलम 328, 188, 272
10 कोतवाली 158/2003 भादवि कलम 379, 34
11 कोतवाली 161/2003 भादवि कलम 379, 34
12 कोतवाली 94/2003 भादवि कलम 457, 380
13 कोतवाली 104/2005 भादवि कलम 457, 380
14 कोतवाली 89/2005 भादवि कलम 454, 380
15 कोतवाली 126/2005 भादवि कलम 457, 380
16 कोतवाली 320/2006 भादवि कलम 457, 380
आरोपी अल्लाउद्दीन इब्राहिम शेख याचेविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा तयारी, जबरी चोरी अशा प्रकारचे एकुण 4 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. राहुरी 243/2019 भादवि कलम 392, 34
2 राहुरी 330/2019 भादवि कलम 394, 34, आर्म ऍ़क्ट 3/25
3 राहुरी 873/2019 भादवि कलम 392, 341, 34
4 राहुरी 952/2019 भादवि कलम 399, 402
आरोपी विवेक लक्ष्मण शिंदे याचेविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा, घरफोडी, विनयभंग अशा प्रकारचे एकुण 3 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीरामपुर शहर 776/2021 भादवि कलम 395, 341
2 श्रीरामपुर तालुका 367/2021 भादवि कलम 457, 380
3 श्रीरामपुर तालुका 201/2021 भादवि कलम 354, 323, 504
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व श्री डॉ. बसवराज शिवपुजे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर, पोउपनि/तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, रणजित जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाठ, उमाकांत गावडे, व अरुण मोरे यांनी केलेली आहे.