अहमदनगर दि. 13 फेब्रुवारी (प्रतिनिधी ) सोमवार
दि. 12/01/2024 रोजी भिंगार पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश राजगुरु यांना गोपनिय माहीती मिळाली की, नागरदेवळे येथे एक इसम दहशत करुन हातात धारदार तलवार अवैध्यरित्या घेऊन फिरत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने सपोनी राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार व बीट मार्शल चे अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार व बीट मार्शल चे अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा रचुन सदर इसम हा पळुन जान्याच्या तयारीत असताना त्यास व त्याचे हातातील धारदार तलवार शिताफीने ताब्यात घेऊन सदर इसमास त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोहेल चॉद शेख वय 26 वर्षे रा नागरदेवळे ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतल्याने सदर इसमा विरुध्द कॅम्प पोस्टे गुरंन 124/2024 आर्म अॅक्ट 4/25 मपोकाक 110/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे सो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी . अमोल भारती यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, सफो कैलास सोनार, सफौ रेवननाथ दहिफळे पोहेकॉ दिपक शिंदे, पोहेकॉ गणेश साठे पोकों अमोल आव्हाड, पोकॉ संदीप थोरात यांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा