नगर शहर जिल्हा काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाची जम्बो कार्यकारणी जाहीर! नाटक, लघुपट, साहित्य, संगीत, बॅकस्टेज आर्टिस्टसह सर्व घटकांना प्रतिनिधित्व, ३८ जणांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी) : शहरात काँग्रेस पक्षाची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघटनात्मक बांधणी सुरू आहे. काँग्रेसने आपल्या विभाग, सेल, फ्रंटल यांच्या कार्यकारणी गठीत करण्याकडे आता लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाची शहर जिल्हा जम्बो कार्यकारिणी काळे यांच्या मान्यतेने विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.बापू चंदनशिवे यांनी जाहीर केली आहे.
यामध्ये नाटक, लघुपट, साहित्य, काव्य, संगीत, माहितीपट, माध्यमे, जाहिरात, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, लघुपट अभिनेते, अभिनेत्री, लघुपट संकलक, कॅमेरामन, समाज अभ्यासाक, चित्रकार, रंगभूषाकार, कला दिग्दर्शक, कलाप्रेमी अशा सांस्कृतिक विभागाशी निगडित सर्वच घटकांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. शहरात पहिल्यांदाच काँग्रेसच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रातील विविध घटकांना पक्षाच्या माध्यमातून संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रा.डॉ.चंदनशिवे म्हणाले की, अहमदनगरला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. राज्यातील चित्रपट, नाट्य क्षेत्रामध्ये देखील नगरचा सहभाग हा संख्यात्मक व गुणात्मकरित्या देखील आज वाढत आहे. ही शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित कलावंतांचे प्रश्न सोडवायचे काम आम्ही करणार आहोत. लवकरच नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडणार असल्याचे चंदनशिवे यांनी म्हटले आहे. कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.
शहर जिल्हाध्यक्ष – प्रा. डॉ. बापू चंदनशिवे (साहित्य, माध्यमे, लघुपट, माहितीपट), कार्याध्यक्ष – दिगंबर नारायण रोकडे (माध्यमे, जाहिरात), उपाध्यक्ष – अमोल देविदास साळवे (नाटककार), सनी दीपक गवळी (चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक), अविनाश सुखदेव मुधळ (नाट्य, लघुपट अभिनेता), हरीश देविदास बारस्कर (अभिनेता), निखिल पेगडयाळ (लघुपट संकलन).
सरचिटणीस – भारत सोळसे (कॅमेरामन, लघुपटकार), गौरव पठाडे (माध्यमकर्मी, लघुपटकार), पांडुरंग काकासाहेब भांडवलकर (लघुपटकार, संकलक), पूजा पठाडे (अभिनेत्री), प्रा. सतीश सातपुते (समाज अभ्यासक), श्रीपाद दगडे (कॅमेरामन). सचिव – स्नेहल भालेराव (अभ्यासक), प्रमोद भागिनाथ जगताप (चित्रकार), दिपाली माणिकराव भांडवलकर (रंगभूषाकार).
सहसचिव – डॉ. कमल सुरूर (उर्दू, हिंदी शायर), प्रशांत लक्ष्मण शिंदे (पत्रकार, लेखक), अरुण शंकर भालेराव (पटकथा लेखक), अजय विजय थोरात (लघुपटकार), वर्षा चंद्रभान पानखडे (अभिनेत्री). कार्यकारिणी सदस्य – कुणाल नंदू चिल्का (अभिनेता, कॅमेरामन), गणेश कुंभार (कला दिग्दर्शक), अक्षय चरण सीतापुर (कवी), प्रियंका पुंड (पत्रकार), प्रा. रावसाहेब दशरथ भवाळ (गायक, लेखक), प्रा. विजया कोळेकर – बिचकुले (राज्यशास्त्र अभ्यासाक, कलाप्रेमी), ऋता ठाकूर (कवयत्री), सिमरन खेडकर (अभिनेत्री).
काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या वतीने मार्गदर्शक मंडळ स्थापन करण्यात आले असून यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. चंद्रकांत पालवे (कवी, लेखक), प्रा. गणेश लक्ष्मण भगत (लेखक, प्रकाशक), अबेद खान (पत्रकार), अर्शद शेख (लेखक, समीक्षक) अरुण आहेर (गायक), प्रा. रामदास धोंडीबा टेकाळे (लेखक), दशरथ शिंदे (कवी), प्रा. विठ्ठल बुलबुले (लेखक, व्याख्याते).
नवयुक्त कार्यकारीणीचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष विद्या कदम, आ.डॉ.सुधीर तांबे, सांस्कृतिक विभाग प्रदेश उपाध्यक्ष अमोल थोरात, प्रदेश सरचिटणीस सम्राट साळवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सचिन गुंजाळ, प्रदेश प्रवक्त्या तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते, सांस्कृतिक विभाग प्रदेश समन्वयक चंद्रकांत पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.