माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मुकुंदनगरच्या अल आमीन मैदानावर वृक्षारोपण

अहमदनगर (प्रतिनिधी) : खेळ हा माणसाला शरीर व मनाने तंदुरुस्त ठेवतो. शहरामध्ये यासाठी मैदानं उपलब्ध असणे आवश्यक आहे. अल अमीन व्हॉलीबॉल क्लबच्या परिसरात या मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंनी वृक्षारोपणासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
मुकुंदनगरच्या अल आमीन व्हॉलीबॉल मैदानाच्या चोहो बाजूंनी वृक्षारोपणाचा उपक्रम मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंनी काँग्रेसचे माजी नगरसेवक फैयाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे. यावेळी माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी थोरात बोलत होते.
यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ.लहू कानडे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, संगमनेर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इंटक जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, हनीफ मोहम्मद जहागीरदार, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान आदींसह खेळाडू, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वृक्षारोपणासाठी फैयाज शेख यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आ.थोरात यांनी यावेळी कौतुक केले. किरण काळे यावेळी म्हणाले की, मुकुंदनगर मध्ये व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. मात्र मैदानं अद्यावत नाहीत. या भागातील तरुणांसाठी अद्यावत मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने फैयाज शेख करत असतात. यासाठी आ.थोरात यांच्या माध्यमातून नक्कीच पुढाकार घेण्याचे काम काँग्रेस करेल.
यावेळी आ. थोरात यांनी मुकुंदनगरला भेट देत वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल फैयाज शेख यांनी आभार मानले. मुकुंदनगरमध्ये किरण काळे यांच्या मागणीवरून आ.थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून रू. ७८ लाख मंजूर करून देत मुकुंदनगरवासियांना विकासात्मक कामांची मोठी भेट दिली होती. मात्र नव्या सरकारने याला स्थगिती दिल्याबद्दल शेख यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. माञ किरण काळे यांच्या माध्यमातून मुकुंदनगर भागाच्या विकासासाठी यापुढील काळातही पाठपुरावा करणार असल्याचे शेख यावेळी म्हणाले.
अल आमीन व्हॉलीबॉल क्लबच्या वतीने आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी यावेळी यूसुफ मेजर, वसीम भाई, असलम सर, समीर पठान, अल आमीन व्हॉलीबॉल क्लबचे अध्यक्ष अक्रमभाई, शहबाज़भाई, मन्सूरभाई, क़य्यूमभाई, कलीमभाई, फरहान, नियाज़ सय्यद, सफवानभाई, नोमान, अकील, आवेज, ज़ीशान, इमरानभाई, जुनेद, अब्दुस सलाम, अल्फेश बिल्डर, बाज़िल,आमिर,आयानभाई, यांच्यासह अल आमीन क्लबचे सर्व खेळाडू उपस्थित होते.