राजकिय

प्रभाग 7 मधील एसटी आरक्षण रद्द न करण्याची अ.नगर जिल्हा भिल्ल असोसिएशनची मागणी मनपा आयुक्तांना निवेदन सादर

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 1 डिसेंबर (प्रतिनिधी)- आगामी महानगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रभाग क्र. ७ सावेडी नाका ते भुतकर वाडी मध्ये अनुसूचित जमात (एसटी) आरक्षित प्रभाग घोषित झालेल्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी या प्रभागात एसटी समाजाचे उमेदवार नसल्याचे कारण देत आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर अ.नगर जिल्हा भिल्ल असोसिएशनतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष सुनील माणिकराव ठाकरे यांनी निवेदनात स्पष्ट केले की, प्रभाग क्रमांक ७ मध्ये सावेडी नाका येथे भिल्ल अनुसूचित जमातीचे अनेक कुटुंबे, मतदार तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार उपलब्ध आहेत.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रभागात ३०० ते ३५० एसटी भिल्ल मतदार असून समाजातील अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे एसटी उमेदवार नाही या कारणावरून आरक्षण रद्द करण्याची कोणतीही गरज नाही, असे ठळकपणे नमूद करण्यात आले.
भिल्ल समाजाचे प्रतिनिधित्व अबाधित राहावे व प्रभाग क्र. ७ ला मिळालेले एसटी आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशी मुख्य मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना नगर जिल्हा भिल्ल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील ठाकरे यांच्यासह राम शिंदे, भरत खाकाळ, भाऊसाहेब फुलपगारे, सुभाष गोलवड, पोपट गोलवड, चंद्रकांत माळी, दत्तात्रय गोलवड, ज्ञानेश्वर गोलवड, गोरख बनकर, रवि गोलवड आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे