कोपरगाव येथील सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हॉटेलवर छापा 2 पीडित परप्रांतीय मुलींची सुटका, 1 आरोपी अटक Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

कोपरगाव दि. ११ ऑगस्ट ( प्रतिनिधी) दि. 11/08/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना कोपरगाव येथील हॉटेल कल्पतरू येथे सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली आहे आणि विजय मवाळ या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
या कारवाईमुळे कोपरगाव शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
*सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर Ad sp यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रदीप देशमुख, HC इरफान शेख,PN कृष्णा कुऱ्हे,PN शिंदे, PC दिनेश कांबळे ,PC गणेश काकडे, LPC धराडे,HC आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली.