देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 25 डिसेंबर: संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नुकत्याच राज्यातील नगरपालिका व नगर परिषदा यांचे निकाल लागले आहेत. लवकरच म्हणजे 15 जानेवारीला राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे साहजिकच राजकीय वातावरण तापू लागले आहे.
लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांच्या देखील निवडणुकीच्या घोषनेची शक्यता वर्तविली जात आहे. आहिल्यानगर तालुक्यातील दरेवाडी जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती पुरुष वर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे साहजिकच सर्वच इच्छुक उमेदवारांनी विविध राजकीय पक्षाँकडे तिकिटासाठी मोर्चे बांधणी सुरु केली असल्याचे चित्र दरेवाडी गटात आहे.
दरेवाडी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्या दिवंगत शारदाताई भिंगारदिवे यांचे नातू व माजी जिल्हा परिषद सदस्या पूनमताई भिंगारदिवे व दिवंगत रोहिदास भिंगारदिवे यांचे चिरंजीव श्रेयश रोहिदास भिंगारदिवे हे आजी, आई, वडील यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर या निवडणुकीला समोरे जात आहेत. अत्यंत शांत, उच्चशिक्षित, संयमी स्वभावाने ते पूर्ण दरेवाडी गावामध्ये व मतदार संघामध्ये परिचित आहेत. तरुण मतदारा प्रमाणेच, वृद्ध, महिला, या मतदाराकडून कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या श्रेयश भिंगारदिवे यांना दरेवाडी गावातील पूर्ण ग्रामस्थामधून मोठा पाठिंबा तर मिळतच आहे. जिल्हा परिषद दरेवाडी गटातून आपल्या हक्काचा उमेदवार श्रेयश रोहिदास भिंगारदिवे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आणण्याचा निर्धार दरेवाडी गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी केला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तसेच मतदार संघातून देखील पाठिंबा मिळत आहे. त्या दृष्टीने गटात समाविष्ट असणाऱ्या सोळा गावातील नातेवाईक, मित्र परिवार, कार्यकर्ते यांच्याशी सपंर्क साधत प्रचार करत आहेत. एकंदरीतच निवडणूक ग्रामस्थांनीच हातात घेतल्याचे चित्र आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा