सामाजिक

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन शहर व ग्रामीण भागात खाजगी कोर्स करून लॅब (वैद्यकीय प्रयोगशाळा)चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्व ठिकाणी(वैद्यकीय प्रयोगशाळा) लॅबचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. शासनाच्या नियमानुसार डी एम एल टी हा कोर्स शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा असावा तसेच त्याला पॅरामेडिकल कौन्सलिंग चे रजिस्ट्रेशन देखील बंधनकारक आहे. परंतु सध्या शहरी व ग्रामीण भागात सर्व लॅब मध्ये डी एम एल टी धारक हे खाजगी कोर्स करून लॅब चालवतात हा नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे तरी रक्त तपासणी लॅब साठी महाराष्ट्र पॅरा वैदक परिषदेने काही निकष ठरवलेले आहे. शिवाय महाराष्ट्र पॅरावैदक अधिनियम 2011 मधील पोट कलमानुसार राज्य नोंद वहीत ज्याची नोंद आहे अशा लॅबने व्यवसाय करण्यास मुभा दिली आहे. इतर व्यक्तीस व्यवसाय म्हणून काम करण्यास बंधनकारक ठेवलेले आहे मात्र अनेक पॅटोलॉजिस्ट यांनी परिषदेची कोणतीही नोंद न ठेवता परस्पर व्यवसाय थाटले आहेत व यात कॉर्पोरेट पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज व बऱ्याच एमडी पॅथॉलॉजी डॉक्टर हे प्रशिक्षित व महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची नोंदणी नसलेल्या व्यक्तींना कमिशन देऊन अशा बोगसगिरीला बढावा देत आहे त्यामुळे रुग्णांना आर्थिक नुकसान व चुकीच्या उपचाराला बळी पडाव लागत असून अशा व्यवसायिकावर कडक कारवाईचे आदेश प्रशासनाला असले तरी अशी कारवाई अद्याप अहमदनगर जिल्ह्यात झाली नाही या सर्वांचे अवलोकन करावे व जिल्ह्यामध्ये सर्व लॅबची तपासणी करून ज्या टेक्निशियनला पॅरामेडिकल कौन्सलिंग मान्यता आहे. त्यांना काम करण्याची परवानगी द्यावी व ज्या टेक्निशियनला पॅरामेडिकल कौन्सिलची मान्यता नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हा शैलेचिकित्सक डॉ.वसंत जमदाडे व डॉ.घुगे यांना निवेदन देताना अखिल भारतीय छावा संघटनेचे महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे समवेत युवक छावा संघटनेचे सचिव दत्ताभाऊ वामन, साहेबराव पाचरणे, भगवान जगताप, बबलू खोसला, मीनाताई जाधव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे