४०० वृक्षरोपणाने केला वाढदिवस साजरा भेट म्हणून दिली नारळ व आंब्याची वृक्ष

करंजी दि.१२ जुलै (प्रतिनिधी) वाढदिवसानिमित्त सुमारे चारशे वृक्षांची लागवड करत अनोख्या पद्धतीने साजरा केलेल्या या वाढदिवसाची परिसरातून कौतुक होत आहे.
कौडगाव ता. पाथर्डी येथील बांधकाम व्यावसायिक तथा भगवतगीतेचे प्रचारक भाऊसाहेब शेलार यांनी त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. केक , फटाके आदिंचा खर्च टाळण्यात आला.यावेळी शेलार यांनी विविध क्षेत्रातील मित्रमंडळींना वाढ दिवसा निमित्त घरी बोलावले. वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास आलेल्या प्रत्येक मित्राला आंबा, नारळ , आवळा , वड ,चिंच अशी सुमारे पाच प्रकारची वृक्ष भेट देऊन त्यांना सन्मानित केले.
तसेच आलेल्या प्रत्येक मित्राच्या हस्ते स्वतःच्या शेतातील बांधावर तसेच घरासमोर सुमारे दीडशे झाडे लावण्यात आली. आपल्या मैत्रीचा वृक्ष माझ्या अंगणात कायम बहरत राहो या हेतुन हे वृक्षा रोपन करण्यात आले.त्यातून सर्वांनी प्रेरणा घेत आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे या हेतूने अशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याचे शेलार यांनी यावेळी सांगीतले.
याप्रसंगी बोलताना हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे कुशलजी भापसे यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगत वृक्ष लागवड ,वृक्ष संवर्धन मोठ्या प्रमाणात करण्याची गरज असल्याचे सांगितले. सुदर्शन महाराज शास्त्री कारखेले म्हणाले की ऑक्सिजनचे महत्व कोरणा मुळे विशद झाले आहे त्यामुळे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत वचना प्रमाणे आपण सर्वांनी प्रत्येकी दोन वृक्षलागवड करून त्याचे संरक्षण केल्यास पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी आदर्श शिक्षक विजयजी कारखेले , एकलव्य संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार सचिन बर्डे , उद्योजक संतोष चोभे, रमेश पालवे , सतीश कारखेले ,संजय तेलोरे ,संदीप पालवे ,राजा भाऊ अकोलकर आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.