दहावी बोर्डाच्या परीक्षेत माळीवाडा बौद्ध वस्तीतील मुलांनी उत्कृष्ट गुण मिळवल्याबद्दल बौद्ध समाजाच्या वतीने सत्कार!

अहमदनगर दि.२१ जून (प्रतिनिधी)- माळीवाडा बौद्ध वस्ती येथील इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवल्याबद्दल समस्त बौद्ध समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करताना विजय भांबळ, सागर विधाते, जय कदम, शिरीष विधाते, शरद विधाते, ताराबाई भिंगारदिवे, साधना जगताप, थोरात ताई, सुहास भांबळ आदी उपस्थित होते. माळीवाडा बौद्ध वस्ती येथील इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत जय ओहोळ ८७.२०, निखिल नवगिरे ९२.४०, सनी चाबुकस्वार ८४.४०, अमित विधाते ९०.६०, निखील साठे ८०.४०, साहिल थोरात ७८.२०, स्वयम् भिंगारदिवे ७९.८०, सिद्धांत भिंगारदिवे ७९.४०, आर्या कदम ७३.४०, सार्थक भांबळ ८१, प्राची जगताप ८३.६०, अपूर्वा कदम ९१.४०, मृणाली जगताप ९४.६० टक्के गुण मिळवल्याबद्दल यांचा समस्त बौद्ध समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विजय भांबळ म्हणाले की बौद्ध समाजाच्या कुटुंबियातील दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले असून तसेच हे सर्व विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असून उत्तम प्रकारे गुण मिळवून त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यामुळे समाजाच्या वतीने सत्कार करून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.