प्रा. विलास साठे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ बहुआयामी व्यक्तिमत्व : सुजीत झावरे पाटील
सेवानिवृत्ती कार्यक्रम अहमदनगर येथे संपन्न जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी शिक्षक कर्मचारी मित्र परिवार उपस्थित

पारनेर( प्रतिनिधी) :
प्राध्यापक विलास साठे हे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले वैचारिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी नेहमी शिक्षण सेवेमध्ये काम केले सर्वांना सोबत घेऊन जाणे हे त्यांचे कौशल्य आहे प्रा. विलास साठे सर हे नेहमी हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्व आहे वासुंदे या ठिकाणी त्यांचे सुरू असलेले सामाजिक व राजकीय कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया सुजित झावरे पाटील यांनी सेवा निवृत्त कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली. अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही प्राध्यापक विलास साठे सर यांना सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमा मध्ये शुभेच्छा देत पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.
पारनेर तालुक्यातील वासुंदे गावचे सुपुत्र असलेले हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित भारत विद्यालय मिरजगाव ता. कर्जत या विद्यालयाचे प्राचार्य राहिलेले मा. प्राचार्य विलास साठे सर हे आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. चाळीस वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी असंख्य विद्यार्थी घडविले. प्राध्यापक विलास साठे सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ रविवार दिनांक ५ जून रोजी सकाळी १० वाजता माऊली सांस्कृतिक भवन नवीन टिळक रोड अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
एक तज्ञ विचारवंत व्याख्याते प्रगल्भ असे तत्त्ववेत्ते आणि कुशाग्र बुद्धिमान शिक्षक व व्याख्याते असलेले प्राध्यापक विलास साठे सर हे शिक्षण सेवेतील प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अहमदनगर या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमा निमित्ताने विविध सामाजिक राजकीय अध्यात्मिक वैचारिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, ढवळपुरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया झावरे पाटील, हिंद सेवा मंडळ मा.मानद सचिव सुनील रामदासी, रिपब्लिकन युनायटेड राज्य अध्यक्ष अशोक गायकवाड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी,प्रा.डॉ.सुधाकर शेलार, दीपक अमृत, संजय कांबळे ,सुनील पंडित ,सयाजी खजिनदार ,रावसाहेब क्षेत्रे ,आप्पासाहेब शिंदे ,शरद दळवी ,गोवर्धन पांडुळे ,गणेश राजापूरे, रमजान सय्यद,शाहुराव साळवे ,मारुती भोरे ,सागर ससाणे ,दिलीप गायकवाड ,कुंडलीक आरवडे, प्रा. डॉ. रत्ना शेळके, प्रा. डॉ. सुरेखा साळवे, प्रा.डाॅ.सुहास पळसापुरे,अशोक आशेरी, नगरसेवक प्रशांत गायकवाड आप्पा नळकांडे , विजय गव्हाळे ,अजय साळवे , विजय भांबळ,अविनाश भोसले, अमित काळे, विवेक भिंगारदिवे, सुहासभाई मुळे,दत्ता जाधव
कृपाल भिंगारदिवे ,जयंत गायकवाड, सुनील क्षेत्रे, नितीन कसबेकर, दिलीप गवते, रानवडे सर, आदिक जोशी, प्रा. संजय साठे ,साई थोरात ,सुनील कुलकर्णी, समाधान आराख, दिलीप सरसे,संजय घोडके, ज्ञानदेव काळे, प्रभू गायकवाड, गौतम रोकडे, सी.के.मोकळ, उत्तम पाळंदे, रामदास शिंदे, विठ्ठल वाघमोडे, आल्हाट सर, शिवाजी सोनावणे, प्रा. गिरीश पाखरे, सुनील सुसरे, राजेंद्र करंदीकर, अमित जाधव, शिवाजी साळवे, शशिकांत पाटील, सुनिल गाडे, मंगेश घोडके,अजिंक्य झेंडे,सूत्रसंचालन शरद मेढे, मंजुश्री घंगाळे, मानपत्र वाचन प्रा. एल. बी. जाधव, आभार प्रा .डाॅ.हनुमंत गायकवाड, प्रास्ताविक प्रा.डाॅ.महेबुब सय्यद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच प्राध्यापक विलास साठे सर यांचा मोठा मित्रपरिवार सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी अहमदनगर येथे उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय बागुल ,अमोल कदम ,मार्तंड ठणगे ,रमेश शिंदे उज्जवला साठे ,मालती जधाव, सविता मेढे, पत्रकार दीपक मेढे ,देशस्तंभ न्यूजचे संपादक महेश भोसले, गोरक्षनाथ बांदल, मधुकर थोरात, सुरेंद्र चव्हाण,भरत साठे, राजेश साठे, सचिन साठे,बाळू साठे, अक्षय साठे,सोनराज साठे, सुभाष साठे यांनी विशेष मेहनत घेतली.