नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 % लागल्याबद्दल गुणवंतांचा सत्कार

अहमदनगर दि.१९ जून (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या अहमदनगर उर्दू हायस्कूलच्या दहावीचा निकाल शंभर टक्के लागला लागल्याने नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये खान गुलसमा मुजीबुररहेमान यास 84.40 %, शेख जूवेरिया अर्शद 84.00 %, सय्यद अर्बिया एजाज – 83.80 %, शेख मारिया मुनाफ – 83.80 % आदीसह विशेष प्राविण्य मध्ये 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व राहिलेले विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले असुन सर्व विद्यार्थ्यांचे ट्रस्टच्या सेक्रटरी रेहान काझी सर, प्रमुख पाहुणे मौलाना अमिन, एजूकेशन बोर्डचे चेअरमन इनामऊल्ला खान, खजिनदार वाजिद खान, ट्रस्टी मुबीन भाई तांबटकर, ईफ्तेखार खान, परवेज खान, शाळेचे मुख्यध्यपिका नजमूस्सहर बाजी, प्राथमिकच्या मुख्यध्यपिका रुमाना बाजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ट्रस्टचे सेक्रटरी रेहान काझी म्हणाले की उर्दू हायस्कूल चा शंभर टक्के निकाल लागला व प्रथम व दृतिय विद्यार्थ्यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व या यशाबद्दल शिक्षकांचा देखील मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त करत येत्या पंधरा दिवसात ट्रस्टच्यावतीने मिसगर अभ्यासिका केंद्र उभारणार असुन यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याची भावना काझी यांनी व्यक्त केली. तर सर्व शिक्षक मंडळ यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.