केंदळ बु – शाळेच्या पहिल्या दिवशी वही, पेन पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत

राहुरी दि.१७ जून (प्रतिनिधी )-
एकनाथ सांस्कृतिक मंडळाचे श्री विरभद्र माध्यमिक विद्यालय , केंदळ बु शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना विद्यालया तर्फे वह्या, पेन,गुलाब पुष्प देऊन औक्षणकरून थाटामाटात पुष्पआक्षदा टाकून स्वागत करून शाळेला सुरुवात करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमी मुळे मागील दोन वर्षापासून अनिमितपणे शाळा भरत असल्यामुळे शाळेला विद्यार्थी मुकत होती. परंतु शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये कोरोणाची लाट ओसरल्यामुळे चालू वर्षी शाळेची घंटा वाजून पहिल्या दिवशी जूनमध्ये नेहमी प्रमाणे शाळांना सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत हजर झाली होती. विरभद्र शाळेत पहिल्या दिवशी जवळपास 85 टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित होती.
विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन तसेच औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात सुंदरशी रांगोळी काढण्यात आली होती. तसेच विविध रंगीबेरंगी फुग्यांनी शाळा सजवण्यात आली होती. तसेच दोन्हीबाजूंनी विद्यार्थ्यानी नवागतांच्या अंगावर पुषपवृष्टी केली व मोठ्या आनंदाने सर्वांनी त्यांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शाळेच्या वतीने पेन, वह्या,मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री गोरक्षनाथ तारडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन वर्षाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. शेळके सर यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षा बद्दल माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन श्री शिरसाठ सर व सौ. जाधव मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन कानडे सर यांनी मानले. हिवाळे सर व धनवडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत केले. संस्थेच्या वतीने सर्वांना विद्यार्थ्याना वही, पेन, पुस्तक याचे वाटप श्री तारडे, कारंडे, शिरसाठ, ठोकळे मामा, लोंढे काका व मावशी यांच्या मदतीने करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राजेंद्र तारडे, नामदेव अण्णा ,तारडे अरुणराव ,डोंगरे नामदेव, कैतके विजय, चव्हाण अण्णासाहेब, देवरे बाळासाहेब, चव्हाण राजु ,योगेश तारडे ,जयराम डुक्रे, अरुण पवार सर योगेश औटी ,श्रीकृष्ण भोसले, सुधीर हापसे ,अविनाश हरिश्चंद्रे उपस्थित होते .