साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने वजीर शेख सन्मानित

प्रतिनिधी (पाथर्डी)
शिर्डी येथील ओमसाई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शनच्या वतीने दिला जाणारा साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने येथील कलावंत वजीर शेख यांना १२ जून रोजी शिर्डी येथील केबीसी हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ओमसाई विकास प्रतिष्ठान आणि बीबीसी फिल्म प्रोडक्शनच्या वतीने कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी पाडळी येथील कलावंत वजीर शेख यांनीही कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिर्डी येथे बीबीसी फिल्म प्रोडक्शनचे अध्यक्ष सुदाम संसारे, भीमसेन चव्हाण, कलावंत राजेश काळे, सूरज अभिनेत्री, कल्पना भावसार, राजेंद्र पोळ जाधव, रेणुका शहाणे, शिल्पा पवार, प्रीती राजपूत आदींच्या हस्ते वजीर शेख यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.