प्रशासकिय

भारतीय इतिहासाचे मोती’ या ग्रंथप्रदर्शनाचा वाचकांनी लाभ घ्यावा;उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ

ऐतिहासिक अहमदनगरच्या 532 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘भारतीय इतिहासाचे मोती’ ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन संपन्न

अहमदनगर, 28 मे (प्रतिनिधी) :-* ‘भारतीय इतिहासाचे मोती’ या ग्रंथप्रदर्शनास वाचकांनी आणि विद्यार्थ्यांनी भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांनी केले. शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
देशभरामध्ये “आजादी का अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाची प्रेरणा देणाऱ्या 6 जून या शिवस्वराज्य दिनानिमित्त तसेच ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 532 व्या स्थापना दिनानिमित्त ‘भारतीय इतिहासाचे मोती’ या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन आज उपजिलहाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर, अहमदनगर ऐतिहासीक वस्तु संग्रहालयाचे अभिरक्षक प्रा. संतोष यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उपजिल्हाधिकारी श्रीमती निर्मळ यावेळी म्हणाल्या या प्रदर्शनात भारताच्या इतिहासाची माहिती पुर्ण पुस्तके, थोर महापुरुषांचे जीवन परिचय तसेच विविध साहित्यीक, लेखकांचे दुर्मिळ पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा. तसचे या ग्रंथप्रदर्शना निमित्त अहमदनगरची अक्षर परंपरा या ऑनलाईन व्याख्यान मालेचे आयोजन सुध्दा केले आहे. या ऑनलाईन व्याख्यानमालेतही नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
या ग्रंथ प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर, अहमदनगर ऐतिहासीक वस्तु संग्रहालयाचे अभिरक्षक प्रा. संतोष यादव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्तावीक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रपती पदक विजेत शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी केले.
हे प्रदर्शन 28 मे ते 8 जून, 2022 या कालावधीत शासकीय सुट्ट्या वगळून सकाळी 10-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, त्रिवेणी बंगला, पंपिंग स्टेशन रोड, भुतकरवाडी, महालक्ष्मी उद्यानाशेजारी, अहमदनगर येथे आयोजित या प्रदर्शनाला जास्तीत जास्त वाचक व इतिहासप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी तसेच शासकीय ग्रंथालयाचे वर्गणीदार होऊन वाचन चळवळ समृद्ध करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील जिल्हा ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे, तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे, लिपीक संतोष कापसे, तालुका ग्रंथपाल संदिप नन्नवरे, जिल्हा ग्रंथपाल अमोल इथापे उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे