अहिल्यानगर दि. 9 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर मतदार संघांचे महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांची शुक्रवारी केडगाव येथे प्रचार फेरी होती. यावेळी केडगाव वेशीजवळ त्यांचे ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवत व जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत केडगावकरानी त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर, सुनील कोतकर, माजी नगरसेवक राहुल कांबळे, संजय लोंढे, शरद ठुबे, महेंद्र कांबळे, महेश गोंडा आदिसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.