रोजगार हमी मध्ये महिलांना डावलून पुरुषांना प्राधान्य म्हैसगांव मधील प्रकार! .

.
राहुरी दि. 20 मे (प्रतिनिधी शेख युनुस)
राहुरी तालुक्यातील म्हैसगांव मध्ये रोजगार हमी मध्ये महिलाना डावलून पुरुषांना प्राधान्य दिले जात आहे .या गावी वन विभागातर्फे रोपवाटिका तयार करण्यात आली आहे त्या मध्ये रोप तयार करणे ,लावणे , रोपाना पाणी घालणे , गावत काढणे असे कामे केली जात आहे . या अगोदर या रोपवाटिकेत महिला व पुरुष काम करत होती परंतु काही काळामध्ये यामधील बऱ्याच महिला बंद करून काही महिलाचे पाच किंवा चार दिवसाचे मास्टर काढले जात होते . या मुळे महिलांनी फक्त सहा दिवस काम करायचे त्या सहा दिवसांमधूनही कधी कधी एक किंवा दोन दिवसही कमी केले जात होते. याची महिलाना जाणीवपूर्वक कल्पनाही वन विभाग देत नव्हते. त्यामुळे महिलांना काम नसल्यामुळे बेरोजगार होऊन मोठे अर्थेक नुकसान सहन करावे लागते .
हा प्रकार पुरुषांच्या बाबतीत मात्र कोणत्याही ठिकाणी कधीच घडत नाही काही पुरुष रोजाने दाखवली जातात व ते आपल्या घरी काम करतात.हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यांना सहा सहा दिवस काम करताना दाखवला जातो. कधी कधी तर सात दिवस काम करताना दाखवला जातात. एकही दिवस त्याचा खाडा लावला जात नाही.
असे प्रकार घडत आहेत यामध्ये महिलांना डावलून पुरुषांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. एकही दिवस त्यांचा खाडा लावला जात नाही. याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये म्हैसगावामध्ये चर्चा चालू आहे. एक घरामधील दोन दोन व्यक्तींना कामावर घेतले जाते. परंतु दुसरा एकही व्यक्ती कामावर घेतला जात नाही. अनेक व्यक्तींनी कामाची मागणी केली. परंतु त्यांच्या मागणी कडे वन विभागाने दुर्लक्ष करत आहे त्याच्या मागणीला केराची टोपी दाखवली आहे. की काय असे बोलले जात आहे .असेच चालू राहिले महिलांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही असेच चालू आहे .
अमोलिक
(वनमजूर )