कर्जतमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून दहन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा कर्जतमध्ये निषेध

कर्जत दि.१०(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक घरावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर तसेच हल्ल्याच्या सुत्रधारावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी रविवारी राष्ट्रवादी कर्जत शहर यांच्यावतीने तहसीलदार कर्जत यांना निवेदन देण्यात आले. तसेच पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदरची घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी असून या घटनेमुळे सर्व कार्यकर्त्याच्या भावना अतिशय तीव्र आहेत. संबंधितावर तात्काळ कठोर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा लोक भावनेचा उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हल्ला करणारे समाजकंटक आणि त्याच्या सुत्रधारावर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. निवेदन पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी स्वीकारले. यावेळी अड गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले. तसेच भाजपाच्या नीच राजकारणाचा जाहीर निषेध म्हणत घोषणा देण्यात आल्या. या निवदेनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा विशाल मेहेत्रे, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष मनीषा सोनमाळी, नगराध्यक्षा उषा राऊत, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल भगत, विद्यार्थी काँग्रेसचे राम जहागीरदार, गटनेते संतोष म्हेत्रे,
विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रतिक ढेरे आदींच्या सह्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, नगरसेवक नामदेव राऊत, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन घुले, युवक राष्ट्रवादीचे नितीन धांडे, उद्योजक दिपक शिंदे, नानासाहेब निकत, तात्यासाहेब ढेरे, ऍड सुरेश शिंदे, दिलीप जाधव, अशोक जायभाय, नगरसेवक अमृत काळदाते, भास्कर भैलूमे, भाऊसाहेब तोरडमल, अभय बोरा, रज्जाक झारेकरी, नगरसेविका प्रतिभा भैलूमे, सचिन कुलथे, सचिन कुलथे, लालासाहेब शेळके, देविदास खरात, रवींद्र सुपेकर, सोशल मीडियाचे दिपक यादव, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.