*ग्रामविकास मंत जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा
ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा
अहमदनगर – दि.25 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
मंगळवार दिनांक 01 मार्च 2022 रोजी सकाळी 8.45 वाजता सांब्रा विमानतळ, बेळगांव येथून खाजगी विमानाने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10 ते 11.30 पर्यंत शिर्डी विमानतळ येथे आगमण व शासकीय मोटारीने अहमदनगर प्रयाण व जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हास्तरीय कोरोना उपाययोजना व लसीकरण आढावा बैठक. दुपारी 12 ते 12.30 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे पत्रकार परिषद. दुपारी 12.30 ते 12.45 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे राखीव. दुपारी 1 ते 3.45 वाजेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय, अहमदनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पदाधिकारी मेळावा. दुपारी 4.45 ते 5.15 वाजेपर्यंत शासकीय मोटारीने अहमदनगर येथून शिर्डी विमानतळाकडे प्रयाण व आगमन. सायंकाळी 5.30 वाजता खाजगी विमानाने शिर्डी येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण.