उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर
अहमदनगर दि. 6 (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
बुधवार दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून शिर्डी विमानतळ काकडी ता. कोपरगावकडे प्रयाण. सकाळी 7.45 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन. सकाळी 7.50 वाजता शिर्डी विमानतळ येथून श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 8.05 वाजता श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथे आगमन. सकाळी 8.10 वाजता श्री साईबाबा मंदिर येथे दर्शन, पुजा इ. करीता राखीव. सकाळी 8.35 वाजता श्री साईबाबा संस्थान येथून मोटारीने व्हॅनि स्पोर्टस शो रुम, अयोध्या कॉम्पलेक्स, पहिला मजला, पिंपळवाडी रोड, शिर्डी ता. राहाताकडे प्रयाण. सकाळी 8.40 वाजता व्हॅनि स्पोर्टस शो रुम येथे आगमन व साई 9 स्पोर्टसच्या शोरुमला सदिच्छा भेट. सकाळी 8.55 वाजता साई 9 स्पोर्ट शे रुम येथून मोटारीने सीटीएस नं. 18/बी, निमगाव को-हाळे ता. राहाताकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता सीटीएस नं. 18/बी, निमगाव को-हाळे ता. राहाता येथे आगमन व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे, शिर्डी येथील 112 पोलीस निवासस्थाने नूतन इमारतींचे उदघाटन. सोईनुसार निमगाव को-हाळे ता. राहाता येथून मोटारीने कोपरगाव शहर पोलीस ठाणे, सीटीएस नं. 1650, कोपरगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाणे सीटीएस नं. 1650 कोपरगाव येथे आगमन, कोपरगाव येथील विविध विकास कामांचे उदघाटन व कोपरगाव शहर पोलीस ठाणे नूतन इमारतीचे उदघाटन, कोपरगाव बसस्थानक नूतनीकृत इमारत उदघाटन, पंचायत समिती, कोपरगाव प्रशासकीय इमारत उदघाटन, कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण. दुपारी 1.30 ते 2.30 वाजता राखीव. दुपारी 4.45 वाजता कोपरगाव येथून मोटारीने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 5.30 वाजता शिर्डी विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण