दिव्यांग व्यक्तींना पालकत्व प्रमाणपत्रांचे वाटप

अहमदनगर, दि.१२ एप्रिल (प्रतिनिधी) – ‘सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील २० दिव्यांग व्यक्तींना कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्याहस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे, विजय बळीद, श्री. कातकडे तसेच दिव्यांग व्यक्ती व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नॅशनल ट्रस्ट अॅक्ट १९९९ ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन व मेंदुचा पक्षाघात हा कायदा केंद्र शासनाने पारित केलेला आहे. सदर कायद्यानुसार ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन व मेंदुचा पक्षाघात असलेल्या आणि त्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झालेल्या दिव्यांग व्यक्तींचे कायदेशीर पालकत्व हे त्यांचे नैसगिक पालक व रक्तातील जवळचे नातेवाईक यांना पालकत्व देण्याची कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.