वंचित बहुजन आघाडीच्या मध्यस्थीने पीडितेला मिळणार न्याय योगेश साठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश !

अहमदनगर दि. २५ मे (प्रतिनिधी):- वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुरी तालुक्यातील खडांबे गावातील अतिश पवार हे परिवारासह २० मे पासून वेस्ट अँड इंजिनिअरिंग कंपनी एल १२२ एमआयडीसी चंद्रकांत करकमकर यांच्या मालकीच्या कंपनी समोर आमरण उपोषणाला बसले होते याची माहिती वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा महासचिव योगेश साठे आणि त्यांचे सहकारी यांना मिळताच यांनी २४ मे रोजी उपोषण स्थळी भेट घेत कंपनी व्यवस्थापक यांची भेट घेत त्यांना चांगले खडेबोल सुनावत मागण्या पूर्ण न झाल्यास कंपनीला टाळे लावू असा इशारा देताच एमआयडीसी पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व सहायक निरीक्षक देवेंद्र पंधरकर यांनी मध्यस्थी करीत कामगार आयुक्त नितीन कवळे यांनी कामगार अधिकारी तुषार बोरसे यांच्या उपस्थितीत कंपनी चालक चंद्रकांत करकमकर आणि व्यवस्थापन कर्मचारी यांना त्याच बरोबर उपोषणकर्ते अतिश पवार आणि परिवारासह कामगार आयुक्त कार्यालय येथे २५ मे रोजी मध्यस्थी करण्याच्या हेतूने बैठक आयोजित केली होती,सदर बैठकी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे सह जिल्हा संघटक फिरोज पठाण,सचिन पाटोळे आदी उपस्थित होते साठे यांनी पीडित अतिश पवार यांना कायमस्वरूपी कामावर रुजू करून घ्यावे तसेच त्याला पूर्ण अपंगत्व आले असल्याकारणाने त्याला भविष्यासाठी आर्थिक तरतूद शासकीय अधिनियम प्रमाणे करून द्यावी असे सूचित केले याला दुजोरा देत कामगार अधिकारी तुषार बोरसे यांनी संमती दर्शवली.यावेळी कंपनीचे मालक हे चंद्रकांत करकमकर हे वैद्याकिय उपचारासाठी पुण्याला असल्याने त्यांच्या वतीने व्यवस्थापक विष्णू औटी हे उपस्थित होते यांनी सांगितले की पीडित अतिश पवार यांना कंपनी कडून शासनाच्या अधिनियमानुसार शासकीय रुग्णालय येथून अपंगत्वाचे प्रमाणपत्राच्या टक्केवारी नुसार जे काही आदेश कामगार आयुक्त नियमानुसारच देय राहील याला आम्ही कबूल आहोत त्याच बरोबर पीडित अर्जदार यांनी केलेल्या अर्ज मधील नमूद असलेल्या गोष्टींची चर्चा कंपनी चालक यांच्याशी करून कळवू त्यामुळे तूर्तास आपण हे उपोषण स्थगित करावे अशी विनंती कामगार अधिकारी तुषार बोरसे व कंपनी व्यवस्थापक विष्णू औटी यांनी केली या विनंतीला मान देऊन,तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव योगेश साठे आणि त्यांचे सहकारी मित्र यांचेसह उपस्थित बांधवांचे सकारात्मक चर्चा घडवून आणल्याने मनःपूर्वक आभार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अतिश पवार आणि परिवार यांनी मानले.
तसेच पुढील कारवाई साठी कामगार अधिकारी तुषार बोरसे यांनी दि १३/०६/२०२३ रोजी कामगार आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनावणी ठेवली असून यासाठी पिडीताने लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी अशी सूचना केली.