केडगावात जागरूक नागरिक मंचाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

केडगावात जागरूक नागरिक मंचाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
केडगाव ( प्रतिनिधी- मनीषा लहारे )
जागरूक नागरिक मंचने शिवजयंती निमित्ताने दि. १७ फ्रेबुवारी रोजी ऑनलाइन शिवव्याख्यानाचे आयोजन करून तसेच आज शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केडगाव वेस येथील मूर्तीस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. पारंपारिक वाद्यवृंदाच्या निनादात व शिवरायांच्या घोषणांने उत्साहात जयंती साजरी केली गेली. मावळचे शिवव्याख्याते प्राध्यापक सोमनाथ गोडसे यांचे ‘ शिवरायांचे लोककल्याणकारी व लोकशाहीवादी विचार ‘ या विषयावर मंत्रमुग्ध करणारे श्रवणीय व्याख्यान संपन्न झाले. घरबसल्या अनेक श्रोत्यांनी व बालचमूंनी शिवरायांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा आनंद घेतला.
प्रजाहितदक्ष जाणता राजाची स्वराज्य ही जगात सर्वांत पहिली लोकशाही ठरली. शिवरायांच्या प्रती महान परदेशिय व्यक्तिंचे विचार व उद्गार तसेच जगाचा पोशिंदा शेतकरी , स्त्रीयांबद्दलचा आदर , बंधुता ,समानता , गनिमीकावे , मित्र यांबद्दलचा विशेष इतिहास गोडसे यांनी सांगितले.
याप्रसंगी मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी प्रास्ताविक , डॉ.सुभाष बागले यांनी शिवरायांची आरती व आभार , उस्मान गनी मन्यार यांनी परिचय , मनीषा लहारे यांनी सुत्रसंचालन , प्रविण पाटसकर व अनिल मरकड यांनी तांत्रिक नियोजन सहकार्य, मंचचे सायबर सेलचे अध्यक्ष अतुल ढवळे यांनी तांत्रिक नियोजन यशस्वी पार पाडले . सुनिल नांगरे , मंदार सटाणकर , गणेश पाडळे , अश्विनी पवार पाचारणे , योगेश खरमाटे , राम खुडे , ज्ञानदेव तुपे , सद्दाम शेख , मंचचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.