जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची ऐतिहासिक कामगिरी! शासकिय योजना यशस्वीपणे राबवत सर्वसामान्यांच्या हितासह जामखेड तालुक्याचाही वाढवला सन्मान

जामखेड दि. 18 मार्च (प्रतिनिधी रोहित राजगुरू ) अमृत महा आवास अभियान ३.० स्पर्धेत जामखेड तालुका नाशिक विभागत पहिला
जामखेड तालुक्याच्या प्रथम क्रमांकासह जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतीलाही राज्य पुरस्कृत आवास योजनेत नाशिक विभागात प्रथम क्रमांक,
कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा, प्रकाश पोळ साहेब यांच्या योग्य नियोजन आणि कार्यतत्परतेचे हे मोठे यश आहे,
शासकीय योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी गटविकास मा,प्रकाश पोळ नेहमीच प्रयत्नशील असतात,
मा, प्रकाश पोळ यांनी मनरेगा अंतर्गत होत असलेल्या वैयक्तिक जलसिंचन विहीरींचाही मोठ्या प्रमाणात लाभ शेतकऱ्यांना मिळवुन दिल्याने ती योजनाही जामखेड तालुक्यात अत्यंत प्रभावीपणे आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे,
अमृत महा आवास योजनेत जामखेड तालुक्याला प्रथम क्रमांक मिळाल्याने व अरणगाव ग्रामपंचायतीनेही राज्य आवास योजनेत प्रथम क्रमांक पटकाविल्याने जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा प्रकाश पोळ साहेब विस्तार अधिकारी खैरे साहेब भजनावले साहेब मिसाळ साहेब माने साहेब गायकवाड साहेब दिक्षित साहेब पंचमुखी साहेब पवार साहेब वाघमारे साहेब
अरणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुश शिंदे ग्रामविकास अधिकारी मा,खुरंगुळे साहेब ग्रामपंचायत सदस्य ऍड संजय पारे गाहिनाथ डमाले उपसरपंच आप्पा राऊत मार्केट कमिटी संचालक डॉ ससाणे रमजान शेख अतुल पाटील यांचे आणि या कामात मोलाचं सहकार्य केलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे सर्व क्षेत्रातुन कौतुक होत आहे.