गावकारभाऱ्यांनी विकासकामासाठी गटतट विसरुन एकत्र येण्याची गरज – आ. कानडे,
विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण

बाळकृष्ण भोसले
राहुरी / प्रतिनिधी — मतदार संघात कोणतेही राजकारण वा गटतट न पाहता विकासकामांवर भर देत सर्वसामान्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे गावकारभाऱ्यांनी आपापले गटतट बाजूला ठेवत मतदार संघातील प्रश्न मांडायला हवेत जेणेकरुन सर्वांगीण विकासकामांवर भर देता येईल असे मत श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहु कानडे यांनी व्यक्त केले
राहुरी तालुक्यातील आमदार निधीतून विविध रस्त्यांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते जनतेशी संवाद साधत होते प्रसंगी त्यांचे समवेत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे समन्वयक अम्रुत धुमाळ अंकुश कानडे उपस्थित होते
प्रसंगी चिंचोली-गंगापूर शिवरस्ता खडीकरण व मजबुतीकरण लोकार्पण १० लक्ष रुपये, केसापूर ते टाकसाळ वस्ती दुरुस्तीसह मजबुतीकरण ३-३० लक्ष लोकार्पण, आंबी ते देवळाली १ की.मी. रस्ता डांबरीकरण २५ लक्ष रुपये, प्रजिमा २६, सोनगाव सात्रळ, रामपूर, कोल्हार खुर्द, चिंचोली, गंगापूर, दवणगाव, आंबी, अंमळनेर चांदेगाव रस्ता सुधारणा ४९१ लक्ष रुपये आदी विकासकामांचे लोकार्पण व भुमिपुजन कार्यक्रम त्यांचे हस्ते पार पाडले
प्रसंगी चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे, गंगापूरचे सरपंच सतीश खांडके, पिंपळगावचे सरपंच रामा वडीतके, कारभारी नान्नोर, विलास लाटे,किशोर गायकवाड, शरद आरगडे, सेनेचे सचिन लाटे, राष्ट्रवादीचे सुनील लाटे, जालिंदर देशमुख, प्रतीक देशमुख, प्रकाश लाटे, सुधाकर पठारे, अनिल पठारे, प्रभाकर पठारे, बन्सी भोसले आदिंसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते
**रंगली वेगळीच चर्चा***
गंगापूर येथील वर्पे वस्तीवर जाण्यासाठीचा रस्ता खड्ड्यात गेला असून तो तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत होते. मात्र दुसरीकडे दशक्रीयाविधीसाठी ओटा बांधून देण्याची मागणी सरपंच यांनी केली, प्रसंगी जिवंत माणसांना जाण्यासाठी रस्ता नाही हा प्राधान्यक्रम की मेलेल्या माणसांना प्राधान्यक्रम यावर चविष्ट चर्चा रंगल्याचे पहावयास मिळाले.