देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 10 एप्रिल, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांनी सुप्रसिद्ध महागायक आनंद शिंदे यांचा भव्य भीमगीत गायनाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा मार्केटयार्ड येथे भीमसैनिकांच्या,आंबेडकरी जनतेच्या अलोट गर्दीत संपन्न झाला.
यावेळी गायक आनंद शिंदे यांनी “जगजेत्याला त्या नेत्याला, करू कोटी कोटी वदंन भारताच्या विधात्याला “
“आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला “
“कुणी नाय केलं भलं ओ माय, भीमानं केलं’, “दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक चवदार तळयावर एक त्या रायगडावर”, “तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं” गाणी गायली या गाण्यानी सर्व वातावरण भिममय झाले होते.
या गाण्यावर भीमसैनिकांनी व आंबेडकरी जनतेने जल्लोष केला.यावेळी आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे,
महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जल अभियंता परिमल निकम, नगरसेवक गणेश भोसले, विजय गव्हाळे,महेश लोंढे, सागर मुर्तुडकर, निखिल वारे,मयूर बांगरे, जेष्ठ नेते अशोक गायकवाड, प्रा. डी. आर. जाधव, प्रा. एल. बी. जाधव, प्रा. डॉ. हनुमंत गायकवाड,
प्रा. भीमराव पगारे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा. विलास साठे, विजय भांबळ,महेश भोसले, किरण दाभाडे, सुमेध गायकवाड, सिद्धार्थ आढाव, अंकुश मोहिते, प्रा.संजय वाघमारे,प्रा. शरद मेढे,विशाल कांबळे,प्रा. श्रीकांत पाखरे,सुरेश भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे,समीर भिंगारदिवे,विनोद गायकवाड, सुजित घंगाळे, रवी साठे,संजय साळवे, विकास रणदिवे, विवेक विधाते, संजय दिवटे, गौरव साळवे,शुभम बडेकर,सोनू म्हस्के,प्रमोद थोरात, राहुल नवगिरे, सुयोग भिंगारदिवे,सचिन जाधव, वैभव औटी, येशूदास वाघमारे, दिपक सरोदे,राहुल साळवे, मेहेर मिसाळ, वृषाल साळवे, प्रबुद्ध कांबळे, अमित घाटविसावे आदीसह शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा