देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 13 मार्च :” तु इतकं दिल, आम्हा हे कधी सराव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, “
“लय मजबूत भीमाचा किल्ला”, “माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, “दोनच राजे इथे गाजले, एक त्या रायगडावर, एक चवदार तळयावर “, या सारख्या अनेक प्रसिद्ध भिमगीतांचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा शिंदेशाही बाणा अहिल्यानगर मध्ये घुमणार आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निम्मित राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग तसेच नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळया जवळ आंबेडकरी चळवळीचे ख्यातनाम गायक आयु. आनंद शिंदे यांचा भव्य भिमगितांचा जंगी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी त्यांची मुंबई येथे भेट घेऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनपा नगरसेवक आयु सुरेशभाऊ बनसोडे , पीआरपी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड , युवा नेते पप्पू भाऊ पाटील , युवा नेते सिद्धार्थ आढाव सर , समीर भिंगारदिवे , संजय दिवटे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा