सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण दिनी या चौकास ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ‘असे नामकरण करा पूर्णाकृती पुतळा समिती, व समाज बांधवांची उपायुक्त मुंढे यांच्याकडे एकमुखी मागणी

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि: 21 जुलै: रविवार दि.27 जुलै 2025 रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती ऐतिहासिक लोकार्पण महासोहळा संपन्न होत आहे.
याच पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड येथील चौकास ‘ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे नामकरण करून तसा नाम फलक उड्डाण पुलाच्या भिंतीवर लावावा, व पूर्वीचा अर्धाकृती पुतळा महानगर पालिकेच्या आवारात बसविण्यात यावा. अशी एकमुखी मागणी सर्व आंबेडकरी समाज बांधव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कृती उभारणी समितीच्या वतीने महानगर पालिकेचे उपायुक्त मुंढे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जल अभियंता परिमल निकम, सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड,माजी नगरसेवक अजय साळवे, सुनील शिंदे,संजय जगताप, सुमेध गायकवाड,कौशल गायकवाड, किरण दाभाडे, नाथा आल्हाट, पोपट जाधव, विजय भांबळ, विशाल भिंगारदिवे, प्रा. विलास साठे, प्रा. डी. आर. जाधव, महेश भोसले, जाधव एल. बी., अंकुश मोहिते, सृजन भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, ऋषी विधाते, सागर विधाते, भाऊसाहेब आल्हाट, ओम भिंगारदिवे, येशूदास वाघमारे, संजय ताकवले आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे