देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर (पाथर्डी ) दि. 8 ऑक्टोबर : रिपब्लिकन सेनेचे जिल्हा पदाधिकारी पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर असतांना, शेलार कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेत, पाथर्डी महिला तालुका अध्यक्षा कविता सोनवणे यांच्या जवखेडे दुमाला येथील निवास्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हाअध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे,वाघमारे ताई, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा संपादक महेश भोसले, पाथर्डी तालुका अध्यक्ष विलास गजभिव, रामदास माळी, तालुका संघटक मिलिंद सोनवणे, युवा नेते अमोल जाधव, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी पक्ष संघटन व आगामी जिल्हा परिषद निवडणुका याबाबत चर्चा करत मार्गदर्शन केले.
यावेळी जेष्ठ नेते विजयराव सोनवणे व कविता सोनवणे यांच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांना स्नेह भोजन देण्यात आले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा